पुन्हा एक ‘सैराट’ ! मुलीच्या वडील, भावाकडून प्रियकराचा दगडाने ठेचून खून

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात मनाविरुद्ध विवाह, प्रेम केल्याने होणारे ‘सैराट स्टाईल’ खूनांचे प्रकार काही थांबता थांबेनात. चंद्रपुरमध्ये असाच प्रसंग एका प्रियकरावर ओढावल्याने त्याचा जीव गेला आहे. मुलीशी प्रेमसंबंध आहेत. म्हणून लग्नाआधीच मुलीच्या बाप आणि भावाने तिच्या प्रियकराला जंगलात नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून केला.

योगेश जाधव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रभुदास धुर्वे आणि कृष्णा धुर्वे या पितापुत्रांनी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात समर्पण केले.

योगेश जाधव याचे घुग्घूस येथील मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. रविवारी त्याच्या प्रेयसीने त्याला भेटायला बोलवले. पंरतु तिला भेटायला निघालेल्या योगेशला तिच्या वडील आणि भावाने मध्येच गाठले. आणि चारगाव येथून त्याला बळजबरीने मोटरसायकलवर बसवून यवतमाळ जिल्ह्यातील निलजईच्या जंगलात घेऊन गेले. त्यानंतर तेथे त्याला बेदम मारहाण करत दगडाने ठेचून त्याचा खून केला. खून केल्यानंतर दोन्ही पिता पुत्र रात्री उशीरा पोलीस ठाण्यात हजर झाले.

Loading...
You might also like