विट्यात वनविभागाच्या गाडीच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू

विटा : पोलीसनामा ऑनलाइन –  वनविभागाच्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बापलेकीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येथील विटा-सांगली रस्त्यावरील मायाक्कानगर येथे घडली. वनविभागाच्या गाडी रस्त्याकडेला असलेल्या घराशेजारी थांबल्याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे या गाडीत विभागाचा चालक असतानाही वनक्षेत्रपाल सागर मगर गाडी चालवत होते.

अनिल धर्मादास गटकुळे (वय 35),मुलगी अवनी अनिल गटकुळे (वय 3 वर्षे दोघे रा.तडवळे ता.आटपाडी) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी हिमा अनिल गटकुळे (वय 30)  या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत विटा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर,निरीक्षक रविंद्र पिसाळ, सहाय्यक निरीक्षक धनाजीराव पिसाळ,उपनिरीक्षक नानासाहेब सावंत यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करुन रस्ता वाहतूकी साठी खुला केला.अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली  होती.