बाप-लेकानं चक्‍क एअरपोर्टवरच दारू ‘ढोसली’, ‘अनाऊंसमेंट’ झाली अन् सगळी ‘उतरली’, ‘रनवे’वर पळाल्यानं दोघे ‘गोत्यात’

इटली : वृत्तसंस्था – विविध व्यसनांच्या सवयीमुळे लोकांना अनेक गोष्टींना मुकावे लागते तसेच अनेक वेळा पश्चतापास सुद्धा सामोरे जावे लागते. अशीच एक घटना इटली मधील कागलीअरी विमानतळावर घडली आहे. ज्यात एक बाप आणि मुलगा विमानतळाच्या बार मध्ये दारू पिण्यात अतिशय मग्न होते. जेणेकरून त्यांना विमानाची अनाउंसमेंट सुद्धा ऐकू गेली नाही. त्यानंतर या दोघांनी चक्क विमानतळाच्या धावपट्टीवर धाव घेतली. ते पाहून पोलिसांनी या दोघांना तात्काळ अटक केली. या बाप लेकांना विमानाची अनाउंसमेंट होऊन गेली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः गेट काढून तसेच हातात सुटकेस घेऊन धावपट्टीवर धावताना दिसले. ते पाहून पोलिसांनी या दोघांना तात्काळ अटक केली. हे दोन्ही इंग्लंडचे नागरिक असून ते लंडनला जाणार होते.

आपत्कालीन दरवाजातून केली धावपट्टीवर एंट्री
येथील स्थानिक पोलिसांनी या बाप लेकांना मूर्खपणा असल्याचे सांगितले. पुढे पोलिसांनी असेही सांगितले की, असा प्रकार प्रकार जर अन्य कोणत्या ठिकाणी घडला असता तर त्यांच्यावर गोळ्या सुद्धा चालवल्या गेल्या असत्या. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगतिल्यानुसार हे दोघे बोर्डिंग गेटवर उशिरा पोचल्यामुळे यांना प्रवेश देण्यात आला नाही तेव्हा यांनी आपत्कालीन दरवाजा उघडून धावपट्टीवर धाव घेतली.

३.४ लाख रुपये दंड भरावा लागणार
तसेच thesun.co.uk ने दिलेल्या माहितीनुसार एन्टोनिनो लोई वय ६५ वर्ष , डीजे टोनी लोई वय ४० वर्ष यांच्यावर ३.४ लाख दंड आकारण्यात आला आहे. हे दोघेही easyJet ने प्रवास करणार होते. परंतु, टोनी लोई ने आपल्या सोबत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगितले आणि आपल्याला आकारण्यात आलेल्या दंडाविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

लोई म्हणाले की, साधारणतः पहिल्या मजल्यावरील गेट मधून बोर्डिंग होत असते. परंतु यावेळेस यांनी खालच्या मजल्यावरील गेट मधून बोर्डिंग केली. आमच्याकडे येत असलेल्या पोलिसांकडे पाहून आम्हाला असे वाटले की, ते रेडिओ वरून विमान थांबण्यासाठी सांगतील आणि अपवादात्मक परिस्थितीत आम्हाला विमानात प्रवेश मिळवून देतील. एन्टोनिनो ने सांगितले की, आम्ही केवळ विमान पकडण्याचा प्रयत्न करत होतो. तसं करणं हा काही गुन्हा नाही. या दोघांनी नशेमध्ये असल्याचे नाकारले आहे. परंतु विमानतळ पोलीस अधिकारी मिम्मो बारी यांनी सांगितले की, हे दोघे विमानतळावरील बार मध्ये दारू पित बसले होते त्यामुळे यांना विमानाची अनाउंसमेंट ऐकू गेली नाही. त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला.

Visit – policenama.com 

You might also like