उन्हाळी सुट्टीत एन्जॉय करण्यासाठी गावी गेलेल्या ‘बाप-लेका’वर काळाचा घाला

मालवण : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावी आल्यानंतर नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या बापलेकाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मालवणमधील श्रावण गावात समोर आली आहे. घरापासून जवळच असलेल्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहिणीसोबत ते गेले होते. तेव्हा हा प्रकार समोर आला.

महेश चंद्रकांत वेदरे आणि मुलगा मयूर महेश वेदरे अशी मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

महेश वेदरे नोकरीनिमित्त मुंबईत राहण्यास होते. ते उन्हाळी सुट्टीमुळे मालवणमधील श्रावण या मुळ गावी आले होते. महेश आणि त्यांचा मुलगा मयूर हे दोघे महेशच्या बहिणीसोबत नदीवर अंघोळीसाठी गेले. बहिणीने त्यांना पाण्यात पुढे न जाण्याची सुचना दिली होती. त्यावेळी ती कपडे धुण्यात व्यस्त होती. त्यादरम्यानच हा प्रकार घडला. मात्र नेमकं काय घडलं. ते समजलंच नाही. तिने काही वेळाने समोर पाहिले तेव्हा दोघेही दिसत नव्हते. तिने मोठमोठ्याने हाका मारल्या. त्यावेळी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तिला दोघेही बुडाले असल्याचा संशय आल्याने तिने आरडाओरडा करत घराच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा ते दोघे दिसत नसल्याचे गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेत नदीत शोध घेतला. तेव्हा त्यांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. आठ दिवस गावी राहून ते मुंबईला परतणार होते. त्याआधीच महेश व मयूरवर काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.