‘ऑनर किलिंग’ ! गर्भवती मुलीचा बापानेच केला खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार घडला असून इच्छेविरुद्ध लग्न केल्याने गर्भवती मुलीचा बापाने गळा चिरून खून केला. या प्रकरणी बापाला आज (सोमवार) अटक करण्यात आली आहे. हा प्रकार घाटकोपर पश्चिमेला रविवारी रात्री घडला. मीनाक्षी ब्रिजेश चौरसिया (वय- २०) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून राम कुमार चौरसिया (वय- ५५) असे अटक करण्यात आलेल्या बापाचे नाव आहे.

Minakshi-Chourasiya

मीनाक्षीने आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याचा राग राम चौरसिया याच्या मनात होता. रविवारी रात्री त्याने घाटकोपर येथील मधुबन टोयोटा शोरुमसमोरील फूटपाथवर मीनाक्षीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

तपासादरम्यान पोलिसांना तिच्याच घरच्यांचा संशय आला. पोलिसांनी गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रीक बाबी पडताळून पाहिल्या असता मृत महिलेचे वडिल राम याच्यावरचा संशय अधिक बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने तिचा खून केल्याची कबुली दिली. मृत मीनाक्षी चार महिन्यांची गरोदर होती. पुढील तपास घाटकोपर पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

 

Loading...
You might also like