कौतुकास्पद ! …म्हणून मुलाच्या स्मरणार्थ वडिलांनी बनवला ‘हेल्मेट चौक’

गांधीनगर : वृ्त्तसंस्था – आजकाल वाहतूक नियमांचं अगदी सहज उल्लघंन केलं जातं. सरकारने तर अनेकदा वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमात बदल केले आहेत. आता सर्वत्र वाहतुक नियम कडक करण्यात आले आहेत. तरीही अनेकजण साधं हेल्मेट घालताना दिसत नाही. अशातच एका वडिलांनी आपल्या स्मरणार्थ एक चांगलं काम हाती घेतलं आहे. सर्वसामान्यांना चागंल्या सवयी लावण्याचा निर्धार केला आहे.

अतुलभाई करिया असं या वडिलांचं नाव असून ते गुजरातमधील पोरबंदर शहरातील माजी महानगरपालिका सचिव आहेत. अपघातात त्यांचा मुलगा मरण पावल्याने त्यांनी असा निर्धार केला आहे आणि हेल्मेट वापरासाठी ते इतरांना प्रोत्साहन देत आहेत. मुलाला श्रद्धांजली देत करिया यांनी हेल्मेट सर्कल म्हणजेच हेल्मट चौक बनवला आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यास जनजागृती करण्यासाठी त्यांनी हे पाऊल टाकलं आहे. अनेकजण असे आहेत जे अगदी सहज वाहतुकीचे नियम फाट्यावर मारत असतात. त्यांच्यासाठी हा उत्तम दाखला आहे.

काय आहे नेमकी घटना ?

अतुलभाई करिया यांचा मुलगा रोड अपघातात मरण पावला. प्रणव असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. दुचाकीवरून प्रवास करताना प्रणवचा एका कारवाल्यासोबत भीषण अपघात झाला. यात प्रणव मृत्युमुखी पडला. त्याने जर तेव्हा हेल्मेट घातलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचलाही असता.

Visit : Policenama.com