धक्कादायक ! स्कॉर्पियोमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार : मुलीच्या वडिलांवर देखील हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीवर स्कॉर्पिओ गाडीत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलाने या मुलीवर बलात्कार केला असून त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दोन जणांना या प्रकरणी अटक केली आहे. झारखंडमधील साहिबगंज येथे सातवीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला किडनॅप करत या मुलांनी त्या मुलीवर स्कॉर्पिओ गाडीत बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिकांनी या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. घटना घडत असताना मुलीच्या पित्याला एका प्रत्यक्षदर्शीने फोन करून सदर घटनेची माहिती दिली असता त्या ठिकाणी जाऊन मुलीला वाचवले. त्यावेळी आरोपींनी मुलीच्या वडिलांवर देखील हल्ला केला. या घटनेत मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो एक्ट अंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या पोलीस स्टेशनमध्ये येऊन या घटनेची माहिती घेतली तसेच या प्रकरणाचा तपास देखील केला. स्थानिक नेत्यांनी देखील या घटनेची निंदा करत लवकरात लवकर आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

Loading...
You might also like