आवडती लेक समलैंगिक असल्याचं समजलं, पित्यानं स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून घेतल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलां-मुलींकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे वाचले असेल. मात्र, नवी दिल्लीमध्ये वडिलांनी वेगळ्याच कारणामुळे स्वत: डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचे समोर आले. आपली पोटची मुलगी समलैंगिक असल्याचे वडिलांना समजताच त्यांना धक्का सहन न झाल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमीक तपासात मुलगी समलैंगिक असल्याने वडिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आपली मुलगी समलैंगिक असल्याने घरात तणाव वाढला होता. मुलीने जेव्हा वडिलांचे ऐकण्यास नकार दिला त्यावेळी वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले. दिल्लीच्या शहदरामधील विश्वास नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी समलैंगिक असल्याचे समजल्यापासून वडिल चिंतेत होते. ही घटना घडण्याच्या आगोदर घरामध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर मंगळवारी रात्री रागाच्या भरात गावठी कट्ट्यातून स्वत:ला गोळी मारून घेतली.

गोळीचा आवाज येताच कुटुंबातील इतर लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर मुलगी समलैंगिक आहे का याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलीस कुटुंबातील इतर व्यक्तींची चौकशी करणार असून शेजाऱ्यांची देखील चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like