हरवलेला बाबा तिला क्षणभर लाभला अन् आनंद फुलला !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेमतेम पाच वर्षांची आदिश्री आपल्या बाबांना बिलगली होती. ती बाबांबरोबर फेर धरून नाचत होती… त्यांना कविता म्हणून दाखवत होती. सहा वर्षांचा ध्रुव इतर बालगोपाळांसोबत खेळत होता खरा, पण त्याचे लक्ष सतत आपल्या बाबांच्या वाटेकडे होते. अशीच काहीशी अवस्था राहुल, विशाखा, किशोर, ब्रिजेश वगैरेंची होती.

आई वडिलांचा घटस्फोट झाले रुसलेले चेहरे, दुभंगलेली मनं अशा अवस्थेत कौटुंबिक न्यायालयाच्या पायरीवर घटस्फोटासाठी येणारी जोडपी आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरील हास्यासाठी, त्याच्या समाधानासाठी आपल्या नात्यातील कटुतेचा पीळ बाजूला सारून मुलामुलींचा हात धरून त्यांच्यासोबत नाचताना, फेर धरताना पाहायला मिळाल्याने ते आईकडे राहत होते, आईच प्रेम तर मिळत होते पण वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिली होते. आजच्या घडीला आई वडिलांचे प्रेम मुलांना मिळन खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच मुलांच्या सुखाकरिता घटस्फोटानंतर हि एकत्र आले. पण जेव्हा तिला तिचे बाबा तिथे दिसले नाही तेव्हा मात्र तिच्या चेहेऱ्यावरचे भाव उदासीनता आणि डोळ्यात निराशेचे शान दिसू लागले पण काही क्षणात तिला तिचे बाबा त्या ठिकाणी दिसले तर तिचा आनंद गगनाला मावेना, काही बालकांच्या चेहेऱ्यावरचा आनंद आकाशात मावत नव्हता तर काही बालकांच्या चेहेऱ्यावर मात्र नाराजगी दिसून आली.

हा अंगळा वेगळा कार्यक्रम खास बालकांसाठी होता कारण घटस्फोटा नंतर मूल हे आई कडे दिले जाते आणि त्या मुलाला वडिलांच्या प्रेमा पासून वंचित राहावं लागत आणि त्या बालकांसाठी खास ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रुसलेले चेहरे, दुभंगलेली मनं अशा अवस्थेत कौटुंबिक न्यायालयाच्या पायरीवर घटस्फोटासाठी येणारी जोडपी आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरील हास्यासाठी, त्याच्या समाधानासाठी आपल्या नात्यातील कटुतेचा पीळ बाजूला सारून मुलामुलींचा हात धरून त्यांच्यासोबत नाचताना, फेर धरताना पाहायला मिळाली. कोणत्याच गोष्टीचा विचार न करता आपल्या मुलाच्या सुखासाठी त्यांच्या आनंदासाठी ते त्यांच्या सोबत मुक्त पणाने बागडताना तिथे पाहायला मिळाले. माझा बाबा एकटाच राहतो, मी आईबरोबर राहते. बाबा कधीतरीच भेटतो. आज कार्यक्रमात दोघांसोबत एकत्र राहता आले, खूप छान वाटलं, कायम असेच असले पाहिजे, असे लहानगी नाव्या निरागस चेहऱ्याने सांगत होती. मी आईसोबतच असते. बाबा खूप दिवस भेटत नाही, पण मला त्याची सतत आठवण येते. आज कार्यक्रमाला बाबा आला. माझ्यासोबत गेम्स खेळला. आय लव्ह माय डॅडा, असे सांगताना छोटीशी आदिश्री बाबाला अक्षरश: बिलगली होती. मी मम्मीसोबतच राहतो. बाबा कधीच भेटत नाही आणि आजही नाही आला, असे सांगताना ध्रुव रडवेला झाला होता. मुलांसोबत आलेले काही पालकही बोलते झाले. घटस्फोटाच्या खटल्यात शेवटच्या टप्प्यावर असलेले किंवा घटस्फोट झालेली काही जोडपी आपल्या मुलासाठी या कार्यक्रमात सहभागी झाली होती. आपल्या एकत्र येण्याने मुलं खूश होणार, म्हणूनच आम्ही कार्यक्रमात एकत्र आल्याचे इंगोले यांनी सांगितले.