नाशिकः : दुर्दैवी ! लेकीच्या लग्नानंतर दोन दिवसांनी वडिलांचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीच्या लग्नानंतर अवघ्या दोन दिवसानी वडिलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळांगी (ता. बागलगाण) येथे घडली आहे. घटनेने अवघा गाव शोकसागरात बुडाला असून हळहळ व्यक्त होत आहे.

पंडीत केशव भोये (वय 56) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंडित भोये यांच्या मुलीचे दोन दिवसापूर्वीच थाटामाटात लग्न पार पडले. लेकीचे लग्न उत्तमरित्या पार पडले म्हणून संपूर्ण भोये कुटूंब आनंदात होते. पण क्षणार्धात या कुटुंबाला नजर लागली. पंडीत भोये यांना अचानक छातीत दुखत असल्याने नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे भोये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.