पुण्यातील धक्कादायक प्रकार ! 55 वर्षीय सासऱ्यानं सुनेकडे केली भलतीच ‘डिमांड’, वेळोवेळी ‘सर्व’ पाहूनच केलं ‘कांड’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चिखली परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ५५ वर्षीय सासऱ्याने सुनेशी लगट केली. त्यानंतर वेळोवेळी तिचा विनयभंग केला. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने सुनेला बेदम मारहाण केली. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार घरात कोणी नसताना सासऱ्याने सुनेला मागून मिठी मारली. त्यानंतर सून ब्लाउज शिवत असताना सासऱ्याने तिच्या सोबत अशोभनीय कृत्य करुन विनयभंग केला. तसेच माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर प्रॉपर्टी मधील हिस्सा देणार नाही अशी धमकी दिली. यानंतरही वेळोवेळी लगट करण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पीडित सून ओटा साफ करत असताना सासऱ्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. सुनेने नकार दिल्यानंतर तिला संबंध ठेवण्यास भाग पडण्यासाठी मारहाण केली. तपास चिखली पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/