धक्कादायक ! सासर्‍यानचं तलवारीनं वार करत केला जावायाचा खून

खानापूर (बेळगाव) : वृत्तसंस्था – कौटुंबिक वादातून सास-याने जावयाचा तलवारीने वार करून खून केला. खानापूर तालुक्यातील कक्केरी येथे सोमवारी (दि. 30) रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर सासरा पसार झाला आहे. घटनेने कक्केरी परिसरात खळबळ उडाली आहे.

बिष्टाप्पा कोनसकोप्प (वय 43) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी बिष्टाप्पा यांच्या शेतात भाताची मळणी सुरु होती. त्यावेळी जावई आणि सास-याचे भांडण सुरु झाले. त्यानंतर भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान सास-याने जावयावर तलवारीने हल्ला केला. यात बिष्टाप्पा याच्या डोक्याला वर्मी घाव लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.

You might also like