बापच करत होता मुलीचा ‘विनयभंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीच्या इज्जतीचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी खरं तर त्याची होती. पण, तोच आपल्या १६ वर्षाच्या मुलीचा गेल्या ६ महिन्यांपासून विनयभंग करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन बिबवेवाडी पोलिसांनी ४५ वर्षाच्या बापाला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही १६ वर्षाची मुलगी अप्पर बिबवेवाडीत राहते. ती रात्री झोपल्यावर तिचा बापच मुलीच्या अंगावर झोपायचा व तिचे बळजबरीने चुंबन घेत. तिला अश्लिल कृत्य करायला भाग पाडायचा. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होती. हा त्रास असाह्य झाल्यावर मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. तेव्हा हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी बापाला अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/