नवजात मुलाची 28 हाडे मोडून वडिलांनी घेतला जीव , कोर्टानं सुनावली 16 वर्षांची शिक्षा

केन्ट (ब्रिटन ) : वृत्तसंस्था – नवजात मुलाची हाडे मोडून क्रूरतेने खून करणाऱ्या वडिलांना कोर्टाने 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सदर घटना जुलै मध्ये ब्रिटनमधील केन्ट येथे घडली होती. ली वर्नन (21) असे या आरोपी वडिलांचे नाव आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये आरोपी वडिलांनी नवजात मुलाला इतक्या क्रूरतेने आपटले की त्याची 28 हाडे मोडली गेली. त्यानंतर वडिलांनी स्वत: आपत्कालीन सेवेची मागणी केली. मुलाची अशी अवस्था कशी झाली हे माहित नसल्याचे वडिलांनी आपत्कालीन सेवा एजंटांना सांगितले. मात्र घटनेच्या काही दिवसानंतर उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.

या घटनेविषयी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना वडिलांनी दिलेली माहिती व वैद्यकीय अहवाल यामध्ये तफावत आढळली. पोलिसांनी आरोपीच्या ऑनलाइन सर्च हिस्ट्रीवरून त्याच्या गुन्ह्याचा माग काढला. ‘मी माझ्या मुलाला खूप जोरात पकडले त्यामुळे त्याच्या शरीरावर निशाण बनले. तुम्ही कधी तुमच्या रडणाऱ्या मुलाला इजा पोहचवली आहे का?’ असे या आरोपी वडिलांनी इंटरनेटवर सर्च केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , खूप गुंतागुंतीचे प्रकरण होते. परंतु वैद्यकीय तज्ञांच्या मदतीने पोलिस तपास पूर्ण करु शकले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल होण्याच्या दिवसाआधीच मुलाला कमीतकमी दोन वेळा दुखापत झाली होती.पुन्हा कोणत्याही मुलाला इजा पोहचवू नये म्हणून वकिलाने वडिलांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. 29 नोव्हेंबर रोजी स्थानिक कोर्टाने दोषी वडील ली वर्नन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला किमान 16 वर्षे तुरूंगात शिक्षा भोगावी लागेल.

Visit : Policenama.com