हैदराबाद रेप केस : आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, पिडीतेच्या वडिलांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरबरोबर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातील चार आरोपींचा शुक्रवारी सकाळी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर पीडितेच्या वडीलांनी सरकार आणि पोलिसांचे आभार मानले. त्यांचे म्हणणे आहे की आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. हैदराबाद घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

आता मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल –

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलीच्या हत्येला दहा दिवस झाले. आज झालेल्या घटनेनंतर मी पोलिसांचे आणि सरकारचे आभार मानतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल.

आरोपीच्या आईने सांगितले की त्याला देखील पीडितेप्रमाणे जाळावे –

27 नोव्हेंबरला आरोपीनी मदतीच्या बाहाण्याने पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेले. जेथे त्यांनी पहिल्यांदा पीडितेशी दुष्कर्म केले आणि त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणाऱ्या या घटनेच्या आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. एक आरोपी असलेल्या केशवुलूच्या आईने भावना व्यक्त केल्या की जसे आरोपींनी पीडितेबरोबर केले तसेच त्यांना देखील जाळून टाकावे.

Visit : Policenama.com