वडिलांवर बलात्काराचा आरोप, कोर्टात सांगितलं – ‘नशेत मुलीनं केली होती सुरूवात’

सिंगापूर : वृत्तसंस्था – आपल्या मुलीने दारूच्या नशेत संबंध ठेवले अशी माहिती लैंगिक अत्याचार प्रकरणात कोर्टात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान एका वडिलांनी स्वत: च्या बचावामध्ये दिली आहे. सदर घटना सिंगापूरची आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत वडिलांनी मुलीबद्दल माहिती कोर्टाला दिली. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 52 वर्षांच्या वडिलांवर 3 वर्षांपूर्वी आपल्या 23 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

वडिलांनी कोर्टात सांगितले की , पीडित मुलगी सतत मद्यपान करते आणि अंमली पदार्थ देखील घेते. मुलीच्या लग्नाच्या काही आठवड्यांनंतरच 2014 मध्ये घटस्फोट झाला होता. मुलीला एकटेपणा जाणवत होता त्यामुळे तिने असे कृत्य केले. या घटनेविषयी त्याने जास्त विचार केला नाही आणि मुलीबद्दल त्याचे कोणतेही वाईट मत नाही.

कोर्टात वकिलांनी आरोपीला विचारले की त्याने पीडित मुलीला का रोखले नाही, वडिलांनी उत्तर दिले की त्याने आत्तापर्यंत मुलीवर हात कधी उगारला नाही किंवा तिला रागावले नव्हते त्यामुळे तिला रोखले नाही.

कोर्टाच्या कागदपत्रांनुसार बलात्काराची घटना 27 मार्च 2016 रोजी घडली होती. त्यावेळी वडील व मुलगी दोघे दारूच्या नशेत होते. वडिलांवर लैंगिक हिंसाचार, चाकूच्या धाकाच्या सहाय्याने मुलीवर बलात्कार करणे आणि धमकावणे यांसारखे नऊ आरोप ठेवण्यात आले आहेत. वडिलांनी मुलीशी संबंध असल्याचे नाकारले नाही, परंतु चाकूची भीती दाखविल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

Visit : Policenama.com