नराधम पित्याचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नराधम पित्याने पोटच्या अल्पवयीन 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन पित्याविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, नराधम पित्याने नऊ नोव्हेंबर रोजी रात्री स्वतःच्या अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब पीडित मुलीने चाईल्ड लाईनच्या कानावर घातली. चाईल्ड लाईनचे पथक सुपा परिसरात गेले. पीडित मुलीला आधार देऊन तिला घेऊन सुपा पोलिस ठाण्यात गेले. सोमवारी रात्री पावणेबारा वाजता सुपा पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नराधम पित्याला अटकही करण्यात आली आहे

पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Visit : Policenama.com