तब्बल 2 वर्षे नराधम बापाकडून 8 वर्षाच्या मुलीवर ‘लैंगिक’ अत्याचार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याच ८ वर्षाच्या मुलीवर नराधम बाप गेली २ वर्षे अत्याचार करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या बापाला अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातील ही घटना आहे.

हा बाप आपल्या मुलीवर गेल्या २ वर्षांपासून अत्याचार करीत होता. ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारुन टाकण्याची धमकी बाप आपल्या ८ वर्षाच्या मुलीला देत होता. त्यामुळे ही मुलगी अत्याचार सहन करत होती. मात्र, दिवसेंदिवस तो सहन करण्यापलिकडे गेल्यावर तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितले. आईने पोलिसांकडे धाव घेत आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.