8 वर्षापासून ‘पप्पा’ माझा रेप करतात पण ‘मम्मी’ काहीच बोलत नाही, मुलीचं पुढचं वाचून सुन्न व्हाल

मेरठ : वृत्तसंस्था – पत्नीच्या मदतीने आपल्या 17 वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या बापाविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सैन्यामध्ये कार्यरत असून तो जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. याप्रकरणात 17 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडला आहे. हा प्रकार आठ वर्षापासून घडत होता असे तरुणीने पोलिसांना सांगितले.

पिडीत तरुणी सध्या 17 वर्षाची असून जेव्हा ती 9 वर्षाची होती, तेव्हा तिचे वडिल तिला चुकीचा स्पर्श करायचे. या छळाविरुद्ध तिने जेव्हा जेव्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिचे वडिल तिला धमकावत होते. या छळाला कंटाळून काही महिन्यापूर्वी तिने घर सोडले. मात्र, तिच्या आईने तिला पुन्हा घरी आणले. पिडीतेने सांगितले की, चार वर्षापूर्वी वडील सुट्टीवर घरी आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा बलात्कार केला आणि नंतर वारंवार बलात्कार केला. माझे वडील माझ्यावर अनेक वर्ष बलात्कार करत होते मात्र, त्यांच्या भितीमुळे मी शांत बसत होते.

पिडीत मुलीने पुढे सांगितले, आईने मोबाईल दिला होता. त्या मोबाईलवर वडील अश्लिल मेसेज पाठवत असत. या प्रकरणाचा अधिक खुलासा करताना तरुणीने पोलिसांना सांगितले की, जेव्हा वडिलांनी तिच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली तेव्हा माझा संयम सुटला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले. मुलीने आपल्या वडिलांवर केलेल्या आरोपासंदर्भात एक ऑडिओ टेपही पोलिसांच्या हाती लागली असून या प्रकरणात हा महत्त्वाचा पुरावा असून आरोपीला शिक्षा होण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like