स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणारा ‘नराधम’ गजाआड

मडगाव (गोवा) : वृत्तसंस्था – बापानेच स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि किळसवाणी घटना गोव्यामध्ये उघडकीस आली आहे. राज्यातील दक्षिण गोवा तालुक्यातील मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी नराधाम बापाला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी बायलाचो एकवोट या बिगर सरकारी संस्थेच्या आवदा व्हिएगस यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे 6 डिसेंबरपूर्वी ही घटना घडली आहे. नराधम बापाने पंधरा वर्षाच्या आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी नराधम बापावर गोवा बाल कायदाअंतर्गत तसेच बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लॉरीन सिक्वेरा पुढील तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/