धक्कादायक ! मुलाच्या जन्मासाठी रजा मागितल्यानंतर कंपनीने मागितला DNA रिपोर्ट, नंतर काढून टाकलं

टोकियो : वृत्तसंस्था – जपानमधील कडक नियमांबद्दल नेहमीच बोलले जाते. आता एक असेच प्रकरण समोर आले असून समोर आले आहे ज्यामध्ये एका व्यक्तीला त्याच्या कंपनीने मुलाच्या जन्मानंतर सुट्टी देण्यास (पितृत्व रजा) देण्यास नकार दिला. या कंपनीने त्याला त्याला केवळ रजा नाकारली गेली नाही तर त्याला धमकावून नोकरीवरून काढून टाकले. यानंतर, त्याने आपल्या कंपनीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली असून आता या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. ही बाब २०१५ सालची आहे. जपानमधील पालकत्व रजेची चर्चेत आलेली ही दुसरी घटना आहे. जपानमध्ये पालकांना मुलाच्या जन्मानंतर एक वर्षाची सुट्टी देण्याची तरतूद आहे. ज्या कंपन्यामध्ये मुलांसाठी नर्सरीची सुविधा नसते त्यांना सहा महिन्यांची अतिरिक्त सुट्टी दिली जाते. जगातील सर्वात कमी जन्मदरामुळे जपान जन्मदरास उत्तेजन देण्यासाठी अशा सुविधा देत आहे.

४९ वर्षीय ग्लेन वूड मूळचे कॅनडाचे आहेत, परंतु गेली तीन दशके जपानमध्ये राहत आहेत. आता ते या ठिकाणचे रहिवासी आहेत. जपानमधील मित्सुबिशी मॉर्गन स्टेनली सिक्युरिटीजमध्ये ते काम करतात. ऑक्टोबर २०१५ मध्ये, त्याच्या पत्नीने नेपाळमध्ये प्रिमॅच्युअर बाळाला जन्म दिला. वुडची पत्नी नेपाळमध्ये काम करत होती म्हणून मुलाचा जन्म तिथेच झाला. वुडने कंपनीत पॅटर्निटी लीव्हसाठी अर्ज केला होता. त्यांनी हा अर्ज देण्यापूर्वीच मुलाचं काम झाला होता.

मुलगा आयसीयूमध्ये होता, पण सुट्टी दिली नाही :
वूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाशी वडिलांचा संबंध आहे हे सिद्ध करण्यासाठी कंपनीकडे डीएनए अहवाल सादर करावा, असे जेव्हा कंपनीने म्हटले तेव्हा वूडला धक्का बसला. वुड म्हणाले, मला माहित आहे की बर्‍याच कंपन्या या प्रकारच्या कृती करतात. पण मला आणीबाणीच्या वेळी सुट्टीची गरज असताना हे घडत होते. माझ्या मुलाला आयसीयूमध्ये दाखल केले होते.

दोन महिन्यांनंतर निघून जा :
त्यावेळी ख्रिसमसपर्यंत कंपनीने माझी सुट्टी मंजूर केली नव्हती आणि तोपर्यंत मी माझ्या मुलाला भेटायला जाऊ शकलो नाही. यानंतर, तो आपल्या मुलाला पाहण्यासाठी जाऊ शकला. मार्च २०१६ मध्ये ते नेपाळहून आपल्या मुलासह जपानला परतले. जेव्हा तो कंपनीकडे परत आला, तेव्हा त्याला बाजूला करण्यात आले. कंपनीत त्याच्याशी ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली त्यामुळे तो नैराश्यात गेला. यानंतर त्याने सहा महिन्यांची वैद्यकीय रजा घेतली. यानंतर, ग्लेन वुड परत आल्यावर कंपनीने त्याला काढून टाकण्यासाठी विनाशुल्क रजेवर ठेवले. त्यामुळे शेवटी वैतागून त्यांनी या कंपनीविरीधात कोर्टात याचिका दाखल केली.

Visit : Policenama.com