टिव्ही पाहण्यावरून पोटच्या मुलाचा चाकूने सपासप वार करुन खून ; वडीलांना १० वर्षे सक्तमजूरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही पाहण्यावरून झालेल्या वादातून पोटच्या मुलावर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी वडीलांना १० वर्षे सक्तमजूरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांनी सुनावली आहे.

नंदू उत्तम आवळे (५६, हडपसर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. त्यांचा धाकटा मुलगा रोहीत आवळे याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. तर राहूल आवळे याने याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना २९ मे २०१५ रोजी सकाळी घडली होती.

यातील खून झालेला रोहीत हा आई-वडीलांसोबत राहात होता. तर राहूल जवळच त्याच्या कुटुंबासोबत राहात होता. दरम्यान २९ मे रोजी राहूल घरी आला होता. दोघे भाऊ टिव्ही पाहात असाताना वडील नंदू आवळे तेथे आले. त्यांनी बातम्या पाहण्यासाठी रिमोट मागितला. त्यावेळी रोहितने आपल्याला सिनेमा पाहायचा आहे. असे सांगितले. त्यामुळे दोघांत वाद झाला. तेव्हा नंदू यांनी थांब तुला मारूनच टाकतो असे म्हणत घरातून चाकू आणला आणि रोहितच्या गळ्यावर वार केले. त्यात रोहितच्या श्वसननलिकेला जखम झाली. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

सरकारी वकील सुनील मोरे यांनी सहा साक्षीदार तपासले. तर पोलीस हवालदार एस. पी. पवार यांनी न्यायालयीन कामासाठी त्यांना मदत केली.