शिक्षक मुलानं गावातील अल्पवयीन मुलीला लॉजवर नेलं, गुन्हा दाखल होताच वडीलांची आत्महत्या

नळदुर्ग (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक मुलावर गावातील मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली बदनामी होईल या भीतीने शिक्षक मुलाच्या वडिलांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला तुळजापूर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी मुलावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून काही ग्रामस्थांनी मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जो पर्यंत मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा संतप्त गावकऱ्यांनी घेतला आहे.
Osmanabad

सुरेश लंगडे (वय-52) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश लंगडे हा अणदूर येथील विविध कार्य़कारी सोसायटीचे चेअरमन असून त्यांचा मुलगा सुशांत लंगडे हा एका राजकीय पुढाऱ्याच्या शाळेत शिक्षक म्हणून कामाला आहे. सुशांत याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीवर तुळजापूर येथील लॉजवर अत्याचार केल्याचा गुन्हा शनिवारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गावात आपली बदनामी होईल या नैराश्येतून सुरेश लंगडे यांनी आज पहाटे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.

या घटनेनंतर अणदूर येथील ग्रामस्थांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. जोपर्य़ंत मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. ग्रमस्थांनी मुलीच्या वडिलांवर आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी नळदुर्ग पोलीस ठाणयात ठाण मांडले असून यामुळे तणाव अधिकच वाढला.

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like