बाप रे ! झोपेत शर्टात शिरला साप

सिव्हिल हॉस्पिटलमधील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झोपलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या शर्टात चक्क साप शिरल्याने एकच धावपळ उडाली. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांच्या ही घटना तत्काळ लक्षात आली. त्यामुळे सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. सर्पमित्राने शर्टात हात घालून साप अलगद बाहेर काढला.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयात एका पेशंटचे नातेवाईक त्यांचासोबत जमिवीवर झोपले होते. ते गाढ झोपलेले असताना शर्टात साप शिरला. साप शर्टात शिराल्याचे रात्रीपाळीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी आकाश जाधव या सर्पमित्राला बोलाविले. सर्पमित्राने झोपलेल्या व्यक्तीला कोणताही धक्का न लावता शर्टात हात घालून लीलया साप बाहेर काढला. तोपर्यंत रुग्णाचे नातेवाईक गाढ झोपलेलेच होते. साप पकडल्यानंतर त्यांना उठवण्यात आले.

सर्पमित्र आकाश जाधव हे जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत सर्वांची तारांबळ उडाली होती. शर्टातून पकडलेला साप गवत्या जातीचा असून तो बिनविषारी असल्याचे जाधव यांनी सांगितले. साप जोपर्यंत स्वतःला सुरक्षित समजतो तोपर्यंत तो कुणालाही दंश करत नाही, अशी माहिती सर्पमित्र आकाश जाधव यांनी यावेळी दिली.

आरोग्य विषयक वृत्त

अर्धवट झोपेमुळे होऊ शकतो व्यायामावर परिणाम

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय

झोपेचे शत्रू वेळीच ओळखा, अनेक आजारांपासून रहाल दूर

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर

Loading...
You might also like