बापानेच केला ५ वर्षाच्या मुलीवर ‘लैंगिक’ अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – रात्री झोपल्यावर बापच आपल्या ५ वर्षाच्या मुलीच्या अवघड जागेशी चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार बावधनमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ३० वर्षाच्या बापावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेची ५ वर्षाच्या मुलीने पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. त्यांनी मुलीला डॉक्टरांकडे नेले. त्यांनी केलेल्या तपासणीत मुलीच्या लघवीची जागा मोठी करण्याचा प्रयत्न झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने पप्पा चाळे करत असल्याचे सांगितले.

याची खात्री करण्यासाठी ही महिला रात्री झोपेचे सोंग घेतले व पतीच्या हालचालीवर लक्ष ठेवले. मुलीने सांगितल्याप्रमाणे तिचा पती मुलीबरोबर चाळे करु लागला. तेव्हा तिने उठून जाब विचारल्यावर त्याने जीव मारण्याची धमकी दिली़ त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

Visit : Policenama.com