धक्‍कादायक ! अनैतिक संबंधाबाबत वडिलांना समजल्यानंतर ‘नाराज’ मुलीकडून प्रियकराच्या मदतीने वडिलांचाच ‘मर्डर’

बेगूसराय (बिहार) : वृत्तसंस्था – वडिलांना अनैतिक संबंधाविषयी समजल्यानंतर मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने वडिलांचा निर्घृण खून केला. तसेच मृतदेह ओळखता येऊ नये यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार बिहार येथील बेगूसराय येथे घडला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून हा प्रकार शनिवारी उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजपती पासवान असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजपतीची मुलगी सीमा देवी आणि तिचे दोन प्रियकर बाबू जान पासवान आणि सुशील पासवान यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबपुर कमाल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १८ जुलै रोजी एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यावेळी ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी तपास केला असता मृतदेह राजपती पासवान याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी केलेल्या तपासात राजपती याचा खून करून मृतदेह फेकून दिला असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी तपासादरम्यान राजपतीची मुलगी सीमाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने दिलेल्या माहितीने पोलिसांना धक्का बसला. तिचे परपुरुषासोबत असलेले अनैतिक संबंध आपल्या वडिलांना समजले होते. तसेच त्यांनी आपल्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आपल्याला पाहिले होते. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून केला. तसेच ओळख पटू नये यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले.

पोलीस अधीक्षक अंजनी कुमार यांनी सांगितले की, राजपती यांच्या मुलीचे लग्न पंचवीर गावातील एका युवकासोबत झाले आहे. राजपती मागील एक महिन्यापासून सीमाकडे राहण्यास आला होता. सीमाचा पती कामानिमित्त बाहेर गावी रहात आहे. याच दरम्यान सीमा आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. राजपती यांनी आपल्या मुलीला इतर पुरुषांसोबत अनैतिक संबध प्रस्तापित करताना पाहिले होते. याचा राग तिला आल्याने तिने हे कृत्य केले.

आरोग्यविषयक वृत्त