home page top 1

…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पिण्यासाठी पाणी नाही म्हणून ३ मुलींनी आणि त्यांच्या वडिलांना सरकारकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे, यासाठी वडिलांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. उत्तर प्रदेशाच्या हाथरसमधील चंद्रपाल सिंह यांनी हे पत्र लिहिले आहे. ते १ वर्षापेक्षा आधी काळापासून गावात येणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांसमोर हात पसरत आहेत आणि तक्रार दाखल करत आहेत परंतू त्यांची ही समस्या ऐकून घेण्यासाठी कोणी तयार नाहीत.

जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार, पण दुर्लक्ष
जिल्हातील जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यत तक्रारी दाखल करण्यात आल्या तरी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने अखेर वडिलांनी मुलीसोबत मरुन जाणेच योग्य समजले आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रार द्यायला गेल्यावर त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणूकीला कंटाळून चंद्रपाल यांनी मोदींना पत्र लिहित इच्छा मरणाची मागणी केला आहे.

हाथरस जिल्हातील हसायन ब्लॉक क्षेत्रातील गावात राहणाऱ्या लाखो लोक खाऱ्या पाण्याने बेहाल झाले आहे. हे पाणी इतके खारे आहे की माणूस काय जनावर, पक्षू देखील हे पाणी पिऊ शकत नाही. या गावातून लोकांना पिण्यायोग्य पाणी मिळवण्यासाठी पायपीट करत २ ते ३ किलोमीटर लांब जावे लागते.

पाणी द्या नाहीतर मरण द्या
खारे पाणी मिळण्याच्या समस्येवरून आतापर्यंत या गावात धरणे आंदोलानापासून आमरण उपोषण या सर्व गोष्टी करुन झाल्या. परंतू याचा या गावाला कोणताही फायदा झालेला नाही. अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येचे समाधान झाले नाही. याला कंटाळून अखेर या गावातील रहिवासी चंद्रपाल सिंह यांनी एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला. यात ते आणि त्यांच्या मुली पाणी द्या किंवा मृत्यू द्या असे नारे देत आहेत आणि इच्छा मरणाची मागणी करत आहेत.

Loading...
You might also like