अन्यथा ‘साध्वी प्रज्ञा सिंह’ यांचा प्रचार करणार नाही

वृत्तसंस्था : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी तरच आम्ही त्यांचा प्रचार करू’ मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी मुस्लिमानां माफी मागावी. तरच त्यांचा प्रचार करू असे एका भाजप नेत्यानी म्हंटलं आहे. भाजपच्या एकमेव उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचाराला नकार दिला. त्यांनी माफी मागितली तरच त्यांचा प्रचार करू असे फातिमा रसूल सिद्दीकी यांनी सांगितले.

‘मी साध्वी प्रज्ञा यांच्यासाठी प्रचार करणार नाही,26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भातही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते’ प्रज्ञा यांनी यासगळ्या गोष्टींपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे. फातिमा या मध्य प्रदेशचे माजी मंत्री मरहूम रसूल अहमद सिद्दीकी यांच्या कन्या आहेत. पण मात्र फातिमा रसूल सिद्दीकी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचाराला विरोध दर्शवला आहे. फातिमा रसूल सिद्दीकी यांना भोपाळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. शिवराजसिंह यांचा मुस्लिमांशी चांगला संपर्क होता. शिवराजसिंह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत’ अस फातिमा यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा विधानानंतर म्हंटल्या.

दिग्विजय सिंह ‘दहशतवादी’, साध्वी प्रज्ञा सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधान

भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना दहशतवादी म्हंटले. सीहोर येथे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. या आधी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही होत आहे.