फातिमा सना शेखचा गौप्यस्फोट ! 3 वर्षाची असताना झालं होतं ‘शोषण’, कास्टिंग काऊचा देखील केला ‘सामना’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमध्ये ( Bollywood) अनेकदा लैंगीक शोषणाचे आणि कास्टिंग काऊचचे ( Casting Cauch) आरोप होत असतात. अशाच पद्धतीने बॉलिवूडमधील अभिनेत्री फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, कशाप्रकारे तिला हिरोईन बनण्यासाठी योग्य समजलं गेलं नाही. कारण ती दीपिका पादुकोण ( Deepika Padukon) आणि ऐश्वर्या रायसारखी (Aishwarya Rai) दिसत नाही. यासोबतच फातिमा सना शेखने लैंगिक शोषण ते कास्टिंग काउचबाबत मोकळेपणाने बोलली. यामध्ये तिला अनेकवेळा रिजेक्शनचा सामना करावा लागल्याचे देखील तिने सांगितले.

तू हिरोईन होऊ शकत नाही’
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ‘मला अनेकदा बोलण्यात आलं होतं की, तू कधीही हिरोईन होऊ शकत नाही. तू दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या रायसारखी दिसत नाही. त्यामुळे तू हिरोईन बनू शकत नाही. अशाप्रकारे लोकांनी मला कमी लेखलं. पण आता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला वाटतं की, ते बरंच योग्य होतं.

कास्टिंग काउचचा केला सामना
याविषयी अधिक बोलताना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सेक्सिज्मचा सामना केला होता. तिने याविषयी खुलासा केला की समाजात सेक्सिज्म इतका जास्त आहे की, जेव्हा मी तीन वर्षांची होते तेव्हा माझ्यासोबत छेडछाड झाली होती. माझा काही अशा लोकांशी सामना झाला आहे जे मला म्हणाले की, नोकरी मिळवण्याची एकमात्र पद्धत सेक्स (Sex) आहे. यामुळे अनेक सिनेमे माझ्या हातून गेल्याचे देखील तिने यावेळी सांगितले.

फातिमाचा सना शेखचा आगामी सिनेमा
फातिमा सना शेखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच दिग्दर्शक अनुराग बसुच्या ‘लूडो’ सिनेमात आणि ‘सूरज पे मंगल भारी’ सिनेमात दिसणार आहे. फातिमाने आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमातून डेब्यू केलं होतं.फातिमा सना शेखने आतापर्यंत आतापर्यंत ‘इश्क’, ‘चाची ४२०’, ‘वन टू का फोर’, ‘बडे दिलवाला’ सारख्या सिनेमात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून देखील काम केले आहे.