‘फत्तेशिकस्त’ मधून उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या हिंदूस्थानातील पहिल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चा ‘थरार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फर्जद या चित्रपटानंतर लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर महाराजांच्या कुशल युद्ध नीतीच्या धोरणाचे दर्शन घडविणारा भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार येत्या 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांना ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

अनेक सैन्य दलांनी युद्धनीतीचे धडे दिले आहेत, परंतू महान नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा फत्तेशिकस्त हा चित्रपट उलगडणार आहे, या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सादर करण्यात आले आहे.

आता ‘थेट घुसायचं आणि गनिमाला तोडायचं’ असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. पोस्टरमध्ये शिवरायाच्या तळपत्या तलवारीचा आणि त्यांच्या आत्मविश्वासाचा दरारा पाहायला मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. हा चित्रपट ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्यातून आल्मंड्स क्रिएशन्स द्वारा तयार करण्यात आला आहे. या चित्रपटातून शिवरायांच्या गनिमी काव्याचे थरारक अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या थरारक चित्रपटाचे छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे असणार आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असणार आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे असेल. व्हि. एफ. एक्स इल्युजन ईथिरिअल स्टुडियोज यांचे आहे. रंगभूषा सानिका गाडगीळ यांचे असणार आहे. फत्तेशिकस्त हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येऊन पहिला सर्जिकल स्ट्राइक दाखण्यास तयार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –