Fatty Liver Cure | फॅटी लीव्हरने असाल त्रस्त तर ‘या’ 5 फूड्सपासून ताबडतोब व्हा दूर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fatty Liver Cure | खराब जीवनशैली आणि खराब आहाराचा (Bad Lifestyle And Wrong Diet) परिणाम लीव्हरच्या आरोग्यावरही (Liver Health) होतो. लीव्हर (Liver) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतो. लीव्हर हे आपल्या शरीराचे पॉवर हाऊस आहे, जे अन्नातील सर्व पोषक घटक जसे की जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स (Vitamins, Minerals, Antioxidants) इत्यादी वेगळे करते आणि शरीराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या अवयवांमध्ये पोहोचवते. लीव्हर 500 हून अधिक कार्ये करते. शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची काळजी घेणे आवश्यक आहे (Fatty Liver Cure).

 

खराब आहार आणि खराब जीवनशैलीमुळे लोक लीव्हरशी संबंधित आजारांना (Liver Disease) बळी पडत आहेत. भारतात लीव्हरच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात लीव्हरच्या समस्यांमुळे होणारे आजार 10 व्या स्थानावर आहेत.

 

लीव्हरच्या समस्येमध्ये फॅटी लिव्हरची समस्या (Fatty Liver Disease) लोकांना जास्त त्रास देत आहे. एका अभ्यासानुसार, सध्या जगातील एक तृतीयांश लोकसंख्या फॅटी लिव्हर आजाराने ग्रस्त आहे.

 

फॅटी लिव्हर ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी काय खावे आणि काय टाळावे, याला खूप महत्त्व आहे. आज आम्ही अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही कोणत्याही स्थितीत टाळलेच पाहिजेत. लीव्हरमधील चरबी कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया (Fatty Liver Cure).

1. वजन कमी करा (Lose Weight) :
जर लीव्हरवर चरबी जास्त असेल तर सर्वप्रथम वजन कमी करण्याचा विचार करा. वजन कमी करण्यासाठी आहारात चरबीयुक्त गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि नियमित चालणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.

 

2. कार्बोहायड्रेट टाळा (Avoid Carbohydrates) :
लीव्हरमधील चरबी कमी करायची असेल तर पांढरा भात, बटाटे, पांढरा ब्रेड असे कार्बोहायड्रेट पदार्थ टाळा. ते आपल्या आतड्यांमधून पटकन शोषले जातात आणि लीव्हरमधील चरबीमध्ये रूपांतरित होतात.

 

3. जास्त फळे आणि ज्यूस पिणे टाळा (Avoid Too Much Fruit And Drinking Juice) :
जर लीव्हर फॅटी (Fatty Liver) असेल तर जास्त फळे खाणे आणि ज्यूस पिणे टाळा.
फ्रक्टोज (Fructose) समृद्ध असलेले बरेच ज्यूस आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स लीव्हरचे आरोग्य बिघडवू शकतात,
त्यांचे सेवन टाळा.

 

4. दारू पिणे बंद करा (Stop Drinking Alcohol) :
अल्कोहोलच्या सेवनाने लीव्हरशी संबंधित आजार वाढू शकतात.
जर तुम्ही अल्कोहोल कमी किंवा मध्यम प्रमाणात घेत असाल तर ते पूर्णपणे बंद करा.

5. मीठाचे सेवन मर्यादित करा (Limit Salt Intake) :
लीव्हर निरोगी ठेवायचे असेल तर मीठाचे सेवन कमी करा.
जास्त मीठ वापरल्याने तुमचा रक्तदाब (Blood Pressure) वाढू शकतो.
जास्त मीठ खाल्ल्याने फॅटी लिव्हरची समस्या वाढू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fatty Liver Cure | 5 foods to avoid if you have fatty liver disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes and Turmeric | सकाळी उठताच हळदीत ‘या’ 2 गोष्टी मिसळून चाटण घ्यावे, रात्रीपर्यंत कंट्रोल राहू शकते Blood Sugar

 

Alcohol Substitute | सिगरेट-दारू सोडायची असेल तर प्या ‘ही’ 5 देशी ड्रिंक, पिताच टेन्शन आणि थकवा होईल गायब

 

Food For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी ’संजीवनी’ आहेत पिवळ्या रंगाच्या ‘या’ 5 गोष्टी, Blood Sugar ठेवतात कंट्रोल