Fatty Liver Home Remedies | फॅटी लिव्हरने असाल त्रस्त तर दररोज करा ‘ही’ 4 योगासन, आहारात करा ‘हे’ 5 बदल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fatty Liver Home Remedies | फॅटी लिव्हर (Fatty liver) ही एक अशी आरोग्याशी संबंधित समस्या आहे जिच्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली खराब जीवनशैली. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाईट सवयींमुळे लोक त्याला बळी पडतात. थकवा, पोट फुगणे, वजन कमी होणे, अपचन यांसारख्या समस्या या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये आढळतात. (Fatty Liver Home Remedies)

 

लिव्हरच्या पेशींवर जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. लिव्हरभोवती काही प्रमाणात चरबी जमा होणे सामान्य आहे. परंतु फॅटी लिव्हरची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा चरबीचे प्रमाण लिव्हरच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त होते.

 

लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी या आजारापासून अधिक सावध राहावे. फॅटी लिव्हरच्या समस्येवर योगासने आणि निरोगी जीवनशैलीने मात करता येते.

 

रोज करा ही योगासने (Do yoga everyday)

1. मंडुकासन (Mandukasana) :
मंडुकचा अर्थ बेडूक असा आहे म्हणजेच हे आसन करताना बेडकाच्या आकारासारखी स्थिती दिसते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम व्रजासनात बसून अंगठा बाहेरच्या दिशेला घेऊन मूठ बंद करा. नंतर दोन्ही मुठी नाभीच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे ठेवा की मुठी उभ्या आणि अंगठे आतील बाजूस असतील. (Fatty Liver Home Remedies)

 

आता श्वास सोडत समोर वाकत हनुवटी जमिनीवर टेका. थोडा वेळ या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा व्रजासनात या. असे केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि लिव्हर निरोगी राहण्यास मदत होते.

2. शशाकासन (Shashakasana) :
शशक म्हणजे ससा. हे आसन करताना माणसाचा आकार सशासारखा होतो. म्हणूनच त्याला शशाकासन म्हणतात. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसा आणि नंतर श्वास घेत दोन्ही हात वर करा. खांदे कानाजवळ असल्याची जाणवू द्या.

 

नंतर पुढे वाकताना दोन्ही हात समांतर पसरवत, श्वास सोडत तळवे जमिनीवर ठेवा. मग जमिनीवर डोके ठेवा. काही वेळ या स्थितीत राहून वज्रासनाच्या स्थितीत परत या.

 

3. गोमुखासन (Gomukhasana) :
नावाप्रमाणेच गोमुखासन करताना माणसाची स्थिती गायीच्या तोंडासारखी होते, म्हणून यास गोमुखासन म्हणतात. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पाय सरळ समोर ठेवून टाच आणि पायाची बोटे एकत्र करून बसा. हात कमरेला लागून आणि तळवे जमिनीवर टेकलेले असावेत.

 

आता डावा पाय वाकवा आणि टाच उजव्या नितंबाजवळ ठेवा. उजवा पाय वाकवा आणि डाव्या पायाच्या वरती एकमेकांना स्पर्श करा. या स्थितीत दोन्ही मांड्या एकमेकांच्या वर येतील.

 

आता एका बाजूला साधारण एक मिनिट केल्यानंतर दुसर्‍या बाजूलाही तेच करा.
या स्थितीत जोपर्यंत सहज राहू शकता तोपर्यंत रहा. काही वेळाने श्वास सोडत हळूहळू हात उघडा आणि आधीच्या स्थितीत या.

 

त्यानंतर उजवा पाय दुमडून उजवा हात वरून मागे घ्यावा, मग एक आवर्तन पूर्ण होईल.
हात, पाय आणि मणक्याची गंभीर समस्या असल्यास हे आसन करू नका.

4. चक्रासन (Chakrasana) :
हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय समोर पसरून बसा आणि दोन्ही हात बाजूला ठेवा.
नंतर उजवा पाय गुडघ्यापासून वाकवा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याच्या रेषेत ठेवा.
नंतर उजवा हात पाठीच्या मणक्याला समांतर ठेवून मागे घ्या.
काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर आता डावा पाय गुडघ्यापासून वाकवून हे आसन करा.

 

यानंतर डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यापर्यंत जमिनीवर ठेवा.
यानंतर, हळू हळू मान मागे न्या आणि शक्य तितके मागे पाहण्याचा प्रयत्न करा.

 

आहारात करा बदल (Change the diet) :

तळलेले आणि जंक फूड खाणे बंद करा.

आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

अन्नामध्ये लसणाचा समावेश करा, लसून चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते.

पालक, ब्रोकोली, कारले, दुधी भोपळा, गाजर, बीट, कांदा, आले आणि अंकुरित कडधान्य खा.

ग्रीन टीचे सेवन करा.

 

तसेच ही समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे प्राणायाम करणे लाभदायक ठरू शकते.

 

Web Title :- Fatty Liver Home Remedies | if you are troubled by the problem of fatty liver then these yogasanas can provide relief Mandukasana Shashakasana Gomukhasana Chakrasana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mala Sinha | ‘या’ अभिनेत्रीच्या बाथरूममधून मिळाले लाखो रूपये; वेश्याव्यवसायाची कोर्टात दिली होती कबुली

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! पुणे शहरातील ‘कोरोना’बाधितांच्या संख्येत मोठी घट ! जाणून घ्या आकडेवारी

 

OBC Political Reservation | OBC राजकीय आरक्षणाबाबत आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण; मुख्यमंत्र्यांकडे आज सादर करणार, 8 फेब्रुवारीला कोर्टात सुनावणी