Fatty Liver | सकाळी उठल्यावर डोळ्यांवर येत असेल सूज, तर असू शकतो फॅटी लिव्हरचा संकेत; जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fatty Liver | लिव्हर (Liver) हा शरीराचा दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. अन्न पचवण्यासोबतच लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. याशिवाय यकृत चरबी कमी करणे, ऊर्जा साठवणे आणि प्रोटीन निर्माण करण्यास मदत करते. लिव्हरवर काही प्रमाणात फॅट अगोदरच असते, परंतु जेव्हा ते आपल्या वजनाच्या 10 पटीने वाढते तेव्हा या स्थितीला फॅटी लिव्हर (Fatty Liver) म्हणतात. फॅटी लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सर सारख्या गंभीर आणि जीवघेण्या स्थितीस कारणीभूत ठरू शकते. यासाठी लिव्हर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

 

फॅटी लिव्हरची लक्षणे (Symptoms of fatty liver) :

1. वजन अचानक कमी होणे
2. पोट फुगणे
3. त्वचा आणि डोळे पिवळे होणे
4. तळवे लाल होणे
5. सकाळी उठल्यानंतर डोळ्यांना सूज येणे

या समस्या फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकतात. फॅटी लिव्हरची लक्षणे लवकर दिसून येत नसल्याने हा आजार गंभीर झाल्यावर निष्पन्न होतो. (Fatty Liver)

 

डोळे सुजणे :
सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात. डोळ्याचा खालचा भाग पूर्णपणे सुजलेला असतो. तशी, ही एक सामान्य समस्या आहे, जी झोपेच्या कमतरतेमुळे होऊ शकते. पण जर ही समस्या सतत होत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.

रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे लिव्हरभोवती फॅट जमा होऊ लागते. त्यामुळे डोळ्यांखाली सूज येते.

 

फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी करावे आवळ्याचे सेवन :
आवळ्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, ई, ए, आयर्न, गुड फॅट आणि कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी ते खूप मदत करते. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी आहारात आवळ्याचा समावेश करावा. मुरंबा किंवा काळ्या मिठासोबत कच्चा आवळा खाऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fatty Liver | swelling on eyes after waking up in morning can be symptom of fatty liver

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Control | वाढत्या वजनावर ‘या’ 7 उपायांनी ठेवा नियंत्रण, अन्यथा तुमची होऊ शकते किडनी निकामी

Sudden Weight Loss | जलदगतीने वजन कमी होणे हे ‘या’ 4 गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, जाणून घ्या

Arthritis Cause Cauliflower | फ्लॉवर खाल्ल्याने वाढू शकते युरिक अ‍ॅसिड, हिवाळ्यात होऊ शकतो चालण्या-फिरण्याचा त्रास