Covid-19 : कधीही पुर्णपणे नष्ट नाही होणार घातक ‘कोरोना’ व्हायरस, सुप्रसिध्द डॉ. फॉसी यांनी दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे आणि यामुळे सर्वाधिक पीडित देश म्हणजे अमेरिका आहे. येथे रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या सर्वांच्या दरम्यान आघाडीचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अ‍ॅथनी फॉसी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याबद्दल चर्चेत आले आहेत. डॉक्टर फॉसी म्हणतात की कोविड -19 कधीच पूर्णपणे संपुष्टात येणार नाही. तथापि त्याच्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. बुधवारी ट्यूबरक्लोसिस अलायन्सद्वारे आयोजित कार्यक्रमात डॉ. फॉसी म्हणाले, ‘मला वाटत नाही की हा विषाणू सार्स 1 प्रमाणे नष्ट होईल.’

2003 मध्ये सार्सचा उद्रेक अनेक महिन्यांपर्यंत चालला आणि अदृश्य होण्यापूर्वी अनेक आशियाई देशांवर त्याचा परिणाम झाला. या आजारामुळे 29 देशांमधील 8,000 हून अधिक लोक आजारी पडले होते आणि सुमारे 774 लोकांचा मृत्यू झाला होता. यापेक्षा कोविड -19 अधिक संक्रामक आहे. जगभरात याचे 1.5 कोटी पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात 618,000 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

डॉक्टर फॉसी म्हणाले, ‘यात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये व्हायरस संक्रमित करण्याची क्षमता खूप जास्त आहे आणि मला वाटते की आपण त्यास नियंत्रणात आणू. तथापि वास्तवात मी यास कायमस्वरूपी नष्ट होत असल्याचे पाहत नाही.’ डॉक्टर फॉसीने त्या उपायांबद्दल देखील सांगितले की कोरोनाला कसे नियंत्रित केले जाऊ शकते.

ते म्हणाले, ‘मला वाटते की योग्य सार्वजनिक आरोग्यसंबंधित उपाय, जागतिक समूह प्रतिकारशक्ती आणि चांगल्या लसीने या विषाणूवर नियंत्रण ठेवता येऊ शकते आणि मला आशा आहे की या तीनही गोष्टी आपण प्राप्त करू. तथापि यावर्षी किंवा पुढील वर्षापर्यंत हा नियंत्रित होईल की नाही याबद्दल मला खात्री नाही. डॉक्टर फॉसी म्हणाले, ‘आम्ही हा विषाणू इतक्या खालच्या पातळीवर आणू की सध्या आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत आपण राहणार नाहीत.’