कोण काय बोलते हे मी ध्यानात ठेवतो : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीमध्ये आपण अजून बाहेरच्या राज्यांत गेलो नाही. मात्र राज्याचा दौरा करत असताना आघाडीसाठी अनुकूल चित्र पहायवयास मिळते. जिल्ह्यात काहीही डॅमेज झालेले नाही. निवडणूक निकालानंतर तुम्हाला हे दिसून येईल. जिथे जाईल त्या ठिकाणी कोण काय बोलते हे मी ध्यानात ठेवतोच, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

राज्याचा दौरा करत असताना सर्वत्र काँग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या आघाडीसाठी अनुकूल चित्र पहावयास मिळते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शरद पवार हे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापुरातून निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आजपर्य़ंत महाराष्ट्रात पंतप्रधानांची एक किंवा जास्तीत जास्त दोन सभा होत असते. मात्र, या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात सात ते आठ सभा घ्याव्या लागत आहेत. यावरुनच आघाडीला पोषक वातावरण असल्याचे दिसून येते. कोल्हापूरमध्ये मला तरी कोठे डॅमेज दिसत नाही. जनता दल भाजपासोबत नाही, एवढे मला नक्की माहित आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या विधानावर ठाम असायचे. शिवसेनेचे सध्याचे नेतृत्व मात्र तसे नाही. हवामानाप्रमाणे ते आपली भूमिका आणि धरण बदलताना दिसत आहेत. युती खड्ड्यात असे तेच म्हणाले होते. मग लोकसभा निवडणुकीत खड्ड्यात गेलेली युती कुठून वर आली, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.