भारत-चीन तणाव : ‘ड्रॅगन’पासून सर्वात मोठा धोका असल्याचं FBI च्या संचालकांनी सांगितलं

नवी दिल्लाी, वृत्तसंस्था : लडाखमध्ये सूरू असलेल्या भारत-चीन सीमा वादा दरम्यान अमेरिका देखील चीन सतत हल्ला करत आहे. मंगळवारी व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेकडून संदेश स्पष्ट आहे की, चीनच्या गैरकारभाराला यापुढे खपवून घेतले जाणार नाही. हेच कारण आहे की, अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात आपले नौदल तैनात केली आहे. आता अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) च्या संचालकांनी चीनविरूद्ध हल्लाबोल सुरु केला आहे. एफबीआय संचालक क्रिस्तोफर रे यांनी वॉशिंग्टनमधील हडसन इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना म्हंटले की, हेरगिरी व चोरीसारखे चीनचे कृत्य अमेरिकन भविष्यासाठी दूरगामी धोका निर्माण करू शकते. चीनने परदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांना मायदेशी परत येण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या कोरोना विषाणू संशोधनावर चीन प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ते म्हणाले कि, चीन कोणत्याही प्रकारे जगात महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मंगळवारी एका तासाच्या भाषणात एफबीआय संचालकांनी चीनकडून होणारा हस्तक्षेप, आर्थिक हेरगिरी, डेटा चोरी, बेकायदेशीर राजकीय कामे, लाचखोरी आणि अमेरिकेच्या धोरणांवर परिणाम करण्यासाठी ब्लॅकमेलिंग यासह अनेक गोष्टींचा उल्लेख केला. क्रिस्तोफर म्हणाले, समस्या अशी आहे की, दर दहा तासांनी चीनशी संबंधित काउंटर इंटेलिजेंस प्रकरण समोर येत आहे. अमेरिकेत सध्या सुमारे 5000 काउंटर इंटेलिजेंस प्रकरणे आहेत, त्यातील निम्म्या चीनशी संबंधित आहेत.

एफबीआय संचालक म्हणाले, चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी फॉक्स हंट नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. ज्या अंतर्गत विदेशातील चिनी सरकारला धोका असणाऱ्या चिनी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. आम्ही येथे मानवी हक्कांच्या उल्लंघनांविषयी चीनच्या राजकीय प्रतिस्पर्धी आणि समीक्षकांबद्दल बोलत आहोत. चीन सरकार त्यांच्यावर परत येण्यासाठी दबाव टाकत आहे आणि त्यासाठी चीनच्या युक्त्या धक्कादायक आहेत. अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, “एक फॉक्स हंट लक्ष्यचा तपास लागला नाही तेव्हा चिनी सरकारने अमेरिकेत त्या व्यक्तीच्या कुटूंबाजवळ एक प्रतिनिधी पाठविला.” त्याने त्या कुटुंबियांना सांगितले कि, त्या व्यक्तीजवळ दोन पर्याय आहे, त्याने ताबडतोब चीनमध्ये परत येणे किंवा आत्महत्या करणे.