‘कंगाल’ पाकिस्तानमध्ये श्रीमंतांना देखील जगणं झालं ‘मुश्कील’, इम्रान खाननं उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानची हालत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. महागाई पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे त्यामुळे इम्रान खान सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे सरकारला आपल्या तिजोरीत आर्थिक वृद्धी होईल अशी अपेक्षा आहे.

इम्रान खान सरकारने सुमारे 1.30 लाख लोकांना इनकम टॅक्स नोटीस पाठवली आहे. खान सरकार आता इनकम टॅक्स बुडवलेल्या लोकांकडून वसुली करणार आहे. याबाबतची माहिती एका पाकिस्तानी वृत्तपत्राने दिली आहे यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की पाकिस्तानात फक्त 1 % लोकच टॅक्स भरतात.

सरकारने पाठवल्या 1,34,848 टॅक्स भारण्यासाठीच्या नोटीस
इम्रान खान सरकारने 1,34,848 इतक्या टॅक्स नोटीस पाठवल्या आहेत ज्यामध्ये पाकिस्तानातील अनेक अनेक शहरांमधील गर्भ श्रीमंत लोकांचा समावेश आहे.एक नजर शहर आणि नोटिसींच्या आकडेवारीवर

शहर – नोटीस संख्या
इस्लामाबाद – 4,600
पेशावर – 15,800
सरगौधा – 15,560
कराची – 10,467
हैदराबाद – 5,198

इनकम टॅक्स डिपार्टमेंट फेडरल बोर्ड ऑफ रिवेन्यू (FBR) ने दिलेल्या माहितीनुसार एका वर्षात टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 15.14 लाख वरून वाढून 25.61 लाखावर गेली आहे. यामध्ये तब्बल 69 % नि वाढ झालेली आहे.

इनकम टॅक्सच्या दर 35 % ने वाढला
50,000 महिना वेतन मिळवणाऱ्यांसाठी आणि 33 हजार 333 रुपए वेतन न मिळवणाऱ्यांसाठी ठेवण्यात आला आहे. इम्रान खान सरकारने नवीन आर्थिक वर्षात केवळ इनकम टॅक्स च्या माध्यमातून 258 अरब रुपए जमा करण्याचा निर्धार केलेला आहे.

Visit  :Policenama.com