सरकारने FCI च्या 80 हजार मजुरांना दिला 15 लाखांपर्यंतचा मोफत विमा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   भारत कोरोना व्हायरसच्या धोक्यात असतानाही देशभरात धान्य पुरवठा व्हावा यासाठी कार्यरत असलेले फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) चे अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. नवीन निर्णयांतर्गत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्यास एफसीआयच्या ८० हजार मजुरांसह एकूण १,०८७१४ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जीवन विमा संरक्षण देण्याच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. सध्या FCI च्या कर्मचाऱ्यांना दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, जमाव हल्ले किंवा इतर नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची तरतूद आहे. यात FCI च्या नियमित व कंत्राटी कामगारांना वगळले आहे.

सरकारचा मोठा निर्णय

आता सरकारने निर्णय केला आहे की, कोरोना दरम्यान काम करणाऱ्या सगळ्या कमर्चारी आणि मजुरांना जीवन विमा संरक्षण दिले जाईल.

याअंतर्गत २४ मार्च २०२० पासून ते २३ संप्टेंबर २०२० पर्यंत ६ महिन्यांच्या दरम्यान FCI आपली ड्युटी
करताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास FCI च्या नियमित मजुरांना १५ लाख रुपये मिळणार.
करार झालेल्या मजुरांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
कॅटेगरी १ मधील अधिकाऱ्यांना ३५ लाख विमा संरक्षण आहे.
कॅटेगरी २ ला ३० लाख रु. विमा संरक्षण आहे.

कॅटेगरी ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांना २५-२५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण दिले गेले आहे.
याची घोषणा करत केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, या संकटात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणाऱ्या आपल्या कोरोना वॉरियर्सना प्रत्येक संरक्षण देण्यास सरकार वचनबद्ध आहे.