FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 5043 पदांसाठी भरती

नवी दिल्ली : FCI Recruitment 2022 | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. ज्युनिअर इंजिनिअरसह विविध पदांच्या भरतीसाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार आज 6 सप्टेंबर 2022 पासून या नॉन एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

FCI Non Executive Recruitment 2022 एकुण पदे

– फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनोग्राफर आणि असिस्टंट ग्रेड 3 यासह 5043 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

वेतनश्रेणी

– निवड झालेल्या उमेदवारांना ज्युनिअर पदांसाठी 34000 रुपये ते 103400 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.

– स्टेनोग्राफर पदांसाठी दरमहा 30500 ते 88100 रुपये वेतन मिळेल.

शैक्षणिक पात्रता

– उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा

– कनिष्ठ अभियंता पदांसाठी वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

– राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सवलत.

– सर्व पदांसाठी पात्रता स्वतंत्रपणे ठरवली आहे. माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना पहावी.

निवड प्रक्रिया

– या पदांसाठी भरतीसाठी निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

FCI Recruitment 2022 साठी असा करा अर्ज

– 6 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अधिकृत वेबसाइट fci.gov.in वर ऑनलाइन अर्ज करा.

– यासाठी 500 रुपये अर्ज शुल्क आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Web Title :- fci recruitment 2022 apply online for non executive posts at fci govin from today know important details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen | सियाचिनमध्ये देशसेवा करताना धुळ्याचे जवान मनोहर पाटील यांना वीरमरण

Pune Pimpri Crime | जुन्या भांडणातून तरुणावर दगड आणि कोयत्याने वार, भोसरीमधील चक्रपाणी वसाहतीच्या मंडई समोरील घटना

PM Kisan 12th Installment | पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, ‘या’ 10 स्थितीत मिळणार नाही पैसा