FDA Pune | पुणे विभागातील 392 औषध दुकानांचे परवाने निलंबित, 105 दुकानांना टाळे; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FDA Pune | पुणे विभागामध्ये (Pune Division) अन्न व औषध प्रशासनाने (Food & Drug Administration Pune) दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे विभागात 392 दुकानांचे परवाने निलंबित (Suspended) करून 105 दुकानांना टाळे लावण्यात आले. एकट्या पुणे जिल्ह्यात जवळपास 195 औषध दुकानांचे (Drug Store) परवाने निलंबित केले आहे. तसेच, 68 दुकानांना कायमचे टाळे लावण्यात आले. याबाबत माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाने दिली. (FDA Pune)

 

त्यांच्या माहितीनुसार, विभागातील पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur) जिल्ह्यात औषध विभागाने औषध दुकानांची तपासणी, रक्तपेढ्या, रक्त साठवणूक केंद्रे, अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, कॉस्मेटिक यांसारख्या शाखांच्या औषध कंपन्यांची तपासणी करण्याची कामगिरी पुणे विभागाच्या ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी केलीय. ही कामगिरी एप्रिल 2021 ते मार्च 2022 या दरम्यानच्या कालावधीत 5 जिल्ह्यात केली गेली आहे. (FDA Pune)

 

पुणे विभागात एकूण 2 हजार 325 औषध दुकानांची तपासणी केली गेली. त्यामधील एकूण 392 दुकानांचे परवाने निलंबित केले गेले. तसेच 105 औषध दुकानांचा परवाना रद्द केला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात आजमितीला साधारण 8000 औषध विक्रीची दुकाने आहे. त्यापैकी जिल्ह्यात 1296 दुकानांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवले होते. औषध निरीक्षकांना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई केलीय. तसेच, निलंबनाच्या कारवाईनंतरही योग्य ती सुधारणा न झाल्याने संबंधित औषधविक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.

”मागील वर्षभरात विविध कंपन्यांच्या औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी ‘FDA’ कडे आल्या होत्या.
त्या तक्रारीच्या आधारे ‘FDA’च्या अधिकाऱ्यांनी पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमधील 15 औषध कंपन्यांवर छापे घातले.
त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 7 कंपन्यांचा समावेश आहे. ‘या कंपन्यांमधून विना परवाना उत्पादन होत असल्याचे आढळले; तसेच कंपन्यांकडून ‘शेड्युल एम’ या आदर्श उत्पादन पद्धतीचे पालन झालेले नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्या कंपन्यांवर कारवाई केली.
त्यामुळे कंपन्यांमधून 1 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
त्या कंपन्यांवर न्यायालयीन कारवाई देखील केली आहे.”

 

”औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या नुसार औषध दुकानांची तपासणी करताना औषधे योग्य तापमानात न ठेवणे,
औषधांची खरेदी – विक्रीचा हिशोब न जुळणे, फार्मसिस्टची नसणे आणि त्याच्या अनुपस्थितीत औषध विक्री करणे,
त्याचबरोबर शेड्युल एच, एच – 1 (Schedule H, H – 1) या वर्गातील औषधांचा ताळमेळ न जुळणे आदी कारणांमुळे औषध दुकानांवर कारवाई केली असल्याचं,” अधिकार्‍यांनी सांगितलं.

 

Web Title :- FDA Pune | food and drug administration action in pune avoiding 105 drug stores

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा