पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापावसह कॅम्प परिसरातील हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात विनापरवाना, अस्वच्छपणे अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी प्रसिद्ध असलेल्या कॅम्पातील गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स व बागवान हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई करण्यात आली. अस्वच्छता ठेवत अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकऱणी त्यांनी अन्न पदार्थ विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल, केटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाक़डून कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत जनहित व जनआरोग्य यांच्या दृष्टीने महत्वाच्या तरतुदींचे उल्लंघन त्यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे शहरात प्रसिद्ध असलेल्या नाना पेठ व कॅम्प येथील गार्डन वडा पाव येथेही पाहणी केली. त्यावेळी तेथे अस्वच्छता आढळून आली. त्यासोबतच तेथे कामगारांची अस्वच्छता, पाण्याची योग्य साठवणूक नाही, तर विना परवाना व्यवसाय, किडक्या बटाट्यांचा वापर, तर पावाचा तपासणी अहवाल नाही.

अशी अवस्था आढळून आली आहे.कॅम्पातील मे. बागवान रेस्टॉरंट येथे प्रशासनाने पाहणी केली त्यावेळी तेथे अस्वच्छता आ{ळून आली. त्यासोबतच कामगारांची अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची योग्य साठवणूक नाही, तसेच विना परावना व्यवसाय करताना आढळून आले. तर एम. जी. रोडवरील मे. अख्तर केटरर्स येथे मोठ्या प्रमाणावर समोसा उत्पादन केले जाते. तेथे अस्वच्तेसोबतच झुरळांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आला आहे. त्यानंतर प्रशासनाने त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

ही कारवाई सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त संजय शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांच्या पथकाने कली.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्यास याबाबत १८००२२२३६५ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.

You might also like