68 हजारांची सुगंधित सुपारी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मावा’ (खर्रा) तयार करण्यासाठी लागणारी ६८ हजार रुपये किंमतीची बारीक केलेली सुपारी, सुटी  सुगंधित सुपारी आणि रत्ना सुगंधित सुपारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ने निरा रस्त्यावरील एका पान शापमधून जप्त केले आहे.

एफडीएकडून निरा रस्त्यावरील आणि जेजूरी पोलीस ठाण्याच्या समोरील सागर पान शॉपवर गुरूवारी ही कारवाई करण्यात आली. कारवाई वेळी १६२५० रुपयांची ६५ किलो बारीक केलेली सूपारी, २६ हजार ८०० रूपयांची रत्ना सुगंधित सूपारी आणि १८ हजार रुपयांची १२ किलो सुगंधित सूटी सुपारी आणि ७ हजार रुपयांचे १४ मावा पॅकेट असे ६८ हजार रूपयांचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अर्जून भुजबळ, अन्न सुरक्षा अधिकारी एस. बी. अंकुश यांनी केली आहे.