पुण्यातील ‘त्या’ मेडिकलवर FDA ची कारवाई ; गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केवळ शासकीय वापरासाठी असणारी औषधे बेकायदेशीररित्या मेडिकल दुकानात विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली असून अन्न व औषध प्रशासनाने एक मेडिकल दुकानावर छापा टाकून हा प्रकार समोर आणला आहे.

मुंढवा पोलिसांनी निरजकुमार सिंग (वय २८, रा. स्वप्नपूर्ती सोसायटी, ससाणेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दखल केला आहे.

हेही वाचा – ‘त्या’ भाजप लोकप्रतिनिधीची ‘अश्लील क्लिप’ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ  

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अतिश सरकाळे यांनी फिर्याद दिली आहे. निरजकुमार सिंग यांचे बी. टी. कवडे रोडवर रॉयल फार्मा हे कार्यालय आहे. तेथे शासकीय वापरासाठी असणाऱ्या januvia 100mg, galvus 50mg या औषधाच्या गोळ्यांचा साठा आढळून आला. २ लाख ८५ हजार ५३० रुपयांची या औषधांच्या स्ट्रीप व कार्टनवरील मजकूर खोडून ती औषधे बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करताना आढळून आले आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.