पुण्यातील तेल व्यापाऱ्याकडून ‘धोका’, भेसळयुक्त तेलाची विक्री, एफडीएकडून छापा, १ लाखांचे माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात तेलाच्या डब्यावर नामांकित ब्रँडचे स्टिकर लावून भेसळयुक्त तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर अन्न व ओषध प्रशासनाने छापा टाकला असून त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीतचे भेसळयुक्त तेल आणि नामांकित कंपन्यांचे ४९ लेबल जप्त केले आहेत. व्यापाऱ्याला व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विलासकुमार धोका असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.
विलासकुमार धोका यांचे मार्केट यार्ड परिसरात खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय आहे. २०१४ पासून ते खाद्यतेल विक्री करत आहेत. परंतु त्यांच्याकडे व्यवसायाची एफडीएची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. किर्ती गोल्ड, ज्योती या नामांकित ब्रॅंडचे लेबल तेलाच्या डब्यांना लावून भेसळयुक्त तेलाची विक्री करत होते. ते कंपनी आणि नागरिकांची फसणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने छापा टाकून कारवाई केली.

ही कारवाई एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. एम. देशमुख व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने केली.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक