पाकिस्तानात सत्‍तांतराची शक्यता ! जनरल बाजवानं रद्द केल्या 111 बिग्रेडच्या सुट्ट्या, इतिहासाची चौथ्यांदा पुनरावृत्ती होणार ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानची अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने पुढाकार घेतल्यानंतर सैन्याने सरकारच्या कामात हस्तक्षेप वाढवला आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मतानुसार इम्रान खान यांची सत्ता उलथून टाकण्याची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांच्या आदेशानुसार येथील सैन्याच्या १११ ब्रिगेडच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांचे मत आहे की पाकिस्तानात १११ ब्रिगेड नेहमीच सत्ता उलथून टाकण्यासाठी वापरली गेली आहे. सूत्रांनी असेही म्हटले आहे की जनरल बाजवा यांनी पाकिस्तानच्या बड्या उद्योजकांशी एक गुप्त बैठक घेतली आहे. या दोन्ही घडामोडी लक्षात घेता पाकिस्तानात सत्ता उलथून टाकण्याची योजना असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सर्व सैनिकांना गुरुवारी सायंकाळपर्यंत कर्तव्यावर परतण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तान लष्कराची १११ ब्रिगेड रावलपिंडी येथे तैनात आहे आणि ती पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाची गॅरिसन ब्रिगेड आहे. या ब्रिगेडचा वापर यापूर्वी जवळपास प्रत्येक वेळी सत्तापालट करण्यासाठी करण्यात आला आहे. म्हणूनच याला ‘तख्तापालट ब्रिगेड’ असेही म्हणतात. इम्रान खान यांना पाकिस्तानी सैन्यानेच पंतप्रधानपदावर बसवले होते, पण यावेळी पाकिस्तानी सैन्य त्यांच्यावर चिडला आहे.

पाकिस्तानात याआधीही तीनदा सैन्याने उलथवली सत्ता :
प्रथम वेळ :
पाकिस्तान मध्ये १९५८ मध्ये प्रथम सैन्याने सत्ताबदल घडून आणला होता. पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती मेजर जनरल ईस्कंदर मिर्झा यांनी पाकिस्तान संसद आणि पंतप्रधान फिरोज खान नून यांचे सरकार उलथून टाकले. त्यावेळी देशात सैन्य कायदा लागू करून लष्कर कमांडर इन चीफ जनरल अयूब खान यांच्या ताब्यात सूत्रे देण्यात आली. १३ दिवसांनंतर अय्यूब खान यांनी मेजर जनरल इस्कंदर मिर्झा यांना राष्ट्रपतिपदावरून काढून टाकले होते.

दुसऱ्यांदा:
सन १९७१ मध्ये भारताबरोबर झालेल्या लढाईत झालेल्या पराभवामुळे आणि बांगलादेशच्या निर्मितीमुळे पाकिस्तानमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. याचा फायदा घेत लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक यांनी ४ जून १९७७ रोजी देशाचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची सत्ता घालविली. यानंतर जनरल झिया-उल-हकने झुल्फिकार यांचा मृत्यू घडवून केला.

तिसरी वेळ :
१९९९ मध्ये कारगिल येथे भारताकडून झालेल्या युद्धात झालेल्या पराभवानंतर तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांचे सरकार उलथून टाकले. जनरल मुशर्रफ यांच्या इशार्‍यावर जेव्हा सत्ता चालविली गेली तेव्हा नवाझ शरीफ श्रीलंकेच्या दौर्‍यावर होते. यानंतर, १२ ऑक्टोबर १९९९ रोजी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या मंत्र्यांना अटक करण्यात आली.

Visit : Policenama.com