Coronavirus : ‘कोरोना’च्या भीतीपोटी 2 महिन्यात परदेशातून भारतात आले तब्बल 15 लाख प्रवासी

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून नागकिर भीतीखाली वावरत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत विविध देशातून सुमारे 15 लाख लोक परदेशात प्रवास करून भारतात परतले आहेत. परदेशातून परतलेल्या नागरिकांच्या तुलनेत फारच थोड्या लोकांना कोरोना व्हायरसच्या कारणास्तव निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी यासंदर्भात राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. गेल्या दोन महिन्यांत दीड दशलक्षहून अधिक लोक परदेशातून भारतात आले आहेत आणि परत येणार्‍या प्रवाशांपैकी देखरेखीखाली आलेल्या लोकांची संख्येत अंतर आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या या पत्रामध्ये परदेशातून परत आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली नाही. ही चिंताजनक बाब आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर याचा गंभीरपणे परिणाम होऊ शकतो, कारण इतर देशांमधून परत येणार्‍या बर्याच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

इमिग्रेशन ब्युरोने 18 जानेवारी 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून अहवाल गोळा केला होता. त्यात परदेशातून आलेल्या लोकाची सविस्तर माहिती आहे. या अहवालात आणि प्रवाशांच्या एकूण संख्येमध्ये फरक आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पुन्हा एकदा परदेशातून आलेल्या प्रवासांची ओळख पटवून घ्यावीत. यापैकी कोरोनाबाधित लोकांचीही चौकशी झाली पाहिजे. मार्गदर्शक सूचनांनुसार या सर्व प्रवाशांवर पाळत ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनाही या कामात मदत घेण्यास सांगितले आहे.