Coronavirus : घरी आपल्या मुलांसोबत कसं वागायचं ? जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिल्या ‘या’ 6 खास ‘पेरेंटिंग’ टिप्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे प्रत्येकजण सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. ज्यामुळे संपूर्ण जगातील फॅमिली लाईफ वाढण्यास मदत होईल. देशातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. पालक वर्क फॉर्म होम करत आहेत. ज्यामुळे ते घरातून बाहेर येत नाहीयेत. जगभरातील पालक आपल्या पाल्यांसोबत (मुलांसोबत) वेळ घालवत आहेत. यासाठी आता डब्ल्यूएचओने आई-वडीलांना 6 टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि कोरोना व्हायरसबद्दल सांगण्यात आले आहे.

क्वालिटी टाइम घालवा
स्कूल कॉलेज बंद झाल्याने पालक आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहेत. त्यांनी त्यांना खूप प्रेम द्यावे. मुलांसोबत 20 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घालवावा.

लहान मुलांसोबत वेळ घालवा
आपल्या मुलांसोबत रहा, त्याच्या सोबत गाणे म्हणा, भांडी – चमचे वाजवून संगीत तयार करा. त्यांना गोष्टी सांगा, पुस्तक वाचायला द्या किंवा फोटो दाखवा.

किशोरवयीन मुलांसाठी टिप्स
त्यांच्या आवडीच्या गोष्टींवर त्यांच्याशी बोला, जसे की खेळ, संगीत, आवडत्या – प्रसिद्ध व्यक्ती, मित्र इत्यादी. घरात मुलांसोबत वावरा, त्यांच्या तुमच्या आवडीची गाणी लावून त्यावर एकत्र व्यायाम करा.

तरुण मुलांसोबत
एक पुस्तक वाचा किंवा चित्र दाखवा, गाण्यावर नृत्य करा, गाणे गा. घरात सफाई करा, मिळून गेम्स खेळा, त्यांच्या शाळेतून देण्यात आलेल्या कामात मदत करा.

सकारात्मक रहा
तुमच्या मुलांवर ओरडू नका, रागावू नका. यामुळे तुमच्यात दूरावा वाढेल. मुलांची प्रशंसा करा. मुले लहान असतात त्यांना ते कळत नाही परंतु तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीच्या कामात त्यांना प्रोत्साहित करा. त्यांच्याकडे लक्ष द्या. मुलांसाठी शांत राहणं अवघड असते.

काहीतरी रोज किंवा काही काही काळानं करा, तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही प्रोग्राम तयार करु शकतात. मुलांना सुरक्षित आणि चांगले वर्तन करण्यास प्रेरित करा. त्यांच्यासाठी दिवसभरातील दिनचार्य करा. जसे की शाळेचे वेळापत्रक तयार करणे. त्यांना व्यायाम करायला लावा. त्यासाठी ऑनलाइन व्हिडिओंची मदत घ्या.

चुकीच्या वागण्यापासून वाचण्यासाठी
डब्ल्यूएचओने यासाठी 3 भाग केले आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे कोणतेही काम किंवा वर्तन चुकीचे वाटत असेल तर त्यांच्याशी बोलण्यापूर्वी 10 सेंकद विचार करा. शांत राहून त्यांच्याशी बोला. डल्ब्यूएचओच्या मते, तुमच्या मुलांना शिक्षा करण्याआधी त्यांना निर्देशांचे पालन करण्याची संधी द्या. शिक्षा दिल्यास शिक्षा संपल्यावर त्यांना काहीतरी चांगले करण्याची संधी द्या, त्यासाठी त्यांची प्रशंसा करा.

स्ट्रेस मॅनेजमेंट
डब्ल्यूएचओने स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही टिप्स दिल्या आहेत. मुलांसोबत वेळ घालवा परंतु तुमच्यासाठी देखील थोडा वेळ काढा. मग तो चहा पिण्याच्या बहण्याने किंवा व्यायाम करण्याच्या बहाण्याने. खुलून जगा आणि तुमच्या मुलांचे बोलणे देखील ऐका. त्यांमुळे ते समर्थन करतील. त्यामुळे ते तुमचे देखील ऐकतील आणि तुम्ही देखील त्यांच्या काही समस्या सोडवू शकतात.

कोरोना व्हायरस संबंधित माहिती द्या
डब्ल्यूएचओने अखेरची टीप दिली आहे. त्यात कोरोनाबद्दल मुलांना माहिती द्या असे सांगण्यात आले आहे. अनेक ऐकीव बातम्यांमुळे मुलं घाबरलेली असू शकतात. यामुळे त्यांच्याशी त्याबद्दल बोला. त्यामुळे त्यांना सांगा की संक्रमणापासून बचावासाठी काय काय उपाय आहेत.