27 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहचली महागाई; जाणून घ्या डाळी आणि भाज्या किती महागल्या ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेब्रुवारी महिन्यात अर्थव्यवस्थेसह महागाईची आणखी एक चिंता पाहायला मिळाली. फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाई दर 4.17 टक्के झाला आहे. मागील 27 महिन्यांमधील ही विक्रमी पातळी आहे. अन्नधान्य, इंधन आणि विजेच्या किंमती वाढल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. तर, घाऊक महागाई जानेवारीत 2.03 टक्क्यांवर होती. त्याचवेळी, एक वर्षापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये ते 2.26 टक्के इतकी होती. ही माहिती सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.

डबल्यूपीआय जानेवारी महिन्यात 2.24 टक्के तर, फेब्रुवारीमध्ये 1.82 इतका टक्के होता. फेब्रुवारी महिन्यात उत्पादित उत्पादनांच्या घाऊक महागाईतही वाढ झाली आहे. फेब्रुवारीत हे प्रमाण 5.81 टक्के होते तर जानेवारी महिन्यात ते 5.13 टक्के होते. महिन्या-महिन्याच्या आधारावर इंधन आणि पॉवर डब्ल्यूपीआयमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण 0.58 टक्के होते तर जानेवारीत ते -4.78 टक्के होते.

जाणून घ्या, किती वाढले भाज्यांचे दर ? :
कित्येक महिने सतत नरम पडल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतींत 1.36 टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात 2.80 टक्के घसरण झाली होती. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात भाज्यांच्या किंमती 2.90 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत तर जानेवारीत त्यांच्या किंमती 20.82 टक्क्यांनी खाली आल्या आहेत.

डाळींचे भावही वाढले :
आपण डाळींबद्दल चर्चा केली तर फेब्रुवारी महिन्यात डाळींच्या किंमती 10.25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी फळांचे दर 9.48 टक्के तर विज बिलची महागाई 0.58 टक्के इतकी होती.

रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यामध्ये व्याज दरात कोणतीही बदल न ठेवता आर्थिक धोरण जाहीर केले होते. हे सलग चौथे पुनरावलोकन होते, ज्यात दरात कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, जर आपण किरकोळ महागाईबद्दल बोललो तर फेब्रुवारी महिन्यातील आकडा 5.03 टक्के इतका आहे.