Federation of Associations of Maharashtra (FAM) | राजेश शहा यांची दि फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी सलग नवव्यांदा निवड

पुणे : मुंबई येथे फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या Federation of Associations of Maharashtra (FAM) दिनांक २० मार्च २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सन २०२३-२०२५ साठी वरिष्ठ उपाध्यक्षपदी राजेश शहा (Rajesh Shah Pune) यांची फेरनिवड करण्यात आली. Federation of Associations of Maharashtra (FAM)

फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) Federation of Associations of Maharashtra (FAM) ही महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना आहे. राजेश शहा हे सन १९९१ पासुन फाम च्या कार्यकारणीवर असुन सन २००५ पासून ते वरिष्ठ उपाध्यक्ष यापदी कार्यरत आहेत. फाम च्या माध्यमातून व्यापार व व्यापाऱ्यांना भेडसवणाऱ्या अनेक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सलग ९ व्या वेळेस झालेली फेरनिवड ही राजेश शहा यांच्या कार्याची व त्यांच्यावर व्यापाऱ्यांच्या असलेल्या विश्वासाची पावतीच आहे.

राजेश शहा यांचा शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व व्यापार क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे.
आर. सी. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि दि पूना गुजराती केळवाणी मंडळाचे चेअरमन,
एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष, पूना गुजराती बंधू समाजचे (Poona Gujarati Bandhu Samaj)
मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार तसेच पूना हॉस्पिटल, श्री. महावीर जैन विद्यालय, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चे ट्रस्टी यासह अनेक संस्थांच्या विविध पदांवर ते कार्यरत आहेत. त्याच बरोबरच राजेश शहा यांनी दि पूना मर्चंट्स चेंबरच्या (The Poona Merchants Chembar) सुवर्ण महोत्सवी वर्षात चेंबरचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वीरीत्या कामकाज पहिले आहे.

आज मुंबई येथे फामचे नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत
सन २०२३-२०२५ साठी राजेश शहा यांची सर्वानुमते वरिष्ठ उपाध्यक्षपदी ही फेरनिवड करण्यात आली.
अशी माहीती जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा (Dhawal Shah, Director of Jayaraj Group) यांनी दिली.

Web Title :-   Federation of Associations of Maharashtra (FAM) | Rajesh Shah has been elected as the Senior Vice President of the Federation of Associations of Maharashtra (FAM) for the ninth time in a row

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mukesh Chhabra | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्याबद्दल मुकेश छाबरा यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले….

Beed Crime News | क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पतीकडून पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या

Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली