पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sat, 20 Apr 2019 06:19:23 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 158698162 साध्वी प्रज्ञांची लोकसभेतील उमेदवारी म्हणजे भाजपची बौद्धिक दिवाळखोरी : एकनाथ गायकवाड https://policenama.com/eknath-gaikwad-on-bjp-and-pradnya-thakur-in-mumbai/ Sat, 20 Apr 2019 06:14:40 +0000 https://policenama.com/?p=107354

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काल भोपाळमधील भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर आहे. त्यावरून सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहेत. साध्वी प्रज्ञा ठाकूर लोकसभा निवडणुकीत उभे करणे ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे, अशी टीका मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केली आहे, ते पत्रकारांशी बोलत होते. हुतात्मा हेमंत करकरेंचा अपमान देश सहन […]

The post साध्वी प्रज्ञांची लोकसभेतील उमेदवारी म्हणजे भाजपची बौद्धिक दिवाळखोरी : एकनाथ गायकवाड appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काल भोपाळमधील भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर आहे. त्यावरून सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहेत. साध्वी प्रज्ञा ठाकूर लोकसभा निवडणुकीत उभे करणे ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे, अशी टीका मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केली आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.

हुतात्मा हेमंत करकरेंचा अपमान देश सहन करणार नाही. जनता निश्चित भाजपला धडा शिकवील. मोदींचा प्रचारही भरकटला आहे. देशातील लोकशाही संकटात असून भाजप एका व्यक्तीच्या नावाने प्रचार करत आहे. हा देश व्यक्तिकेंद्रीत देश कधीच नव्हता. संघाने स्वातंत्र्याला विरोध केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मी मुंबईत आलो त्यावेळी हमाल होतो, परंतु त्याचे भांडवल कधी केले नाही. जनता मतदानातून निश्चित भाजपला धडा शिकवेल, असं गायकवाड यांनी म्हटलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांवरही त्यांनी यावर आपले मत व्यक्त केले. राज ठाकरेंमुळे परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. शिवसेनेचा मतदार आता काँग्रेसला मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शहरी लोकसंख्या वाढत आहे. स्मार्ट सिटी ही चांगली संकल्पना होती. झोपडपट्टी निर्मुलन आणि रिफ्यूजी कॅम्पचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. धारावी पुर्नविकास अजूनही प्रलंबित आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्पोरेट कार्यालय पूर्ण होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहू शकले नाही. मोदी सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच नोटबंदी आणि जीएसटीने धारावीसह देशातील लहान उद्योग नष्ट झाले. जीएसटीची पुर्नरचना केली पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

The post साध्वी प्रज्ञांची लोकसभेतील उमेदवारी म्हणजे भाजपची बौद्धिक दिवाळखोरी : एकनाथ गायकवाड appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107354
राज ठाकरेंवर भाजपची टीका ; उत्तर दिलं अजित पवारांनी ! https://policenama.com/ajit-pawar-saying-on-bjp-on-raj-thackeray-crises/ Sat, 20 Apr 2019 06:02:39 +0000 https://policenama.com/?p=107348 ajit-pawar
ajit-pawar

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा लोकसभेत मनसेने अप्रत्यक्षरित्या पाऊल ठेवलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आघाडीच्या बाजूने आपला प्रचार करत आहेत. त्यांच्या या प्रचारावर भाजपने जोरदार टीका केली. त्यावरून भाजपला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्याकडे सभा घेण्यासाठी पैसे कुठून येतात या विचाराने भाजपवाले डोकं खाजवतात. राज ठाकरेंच्या सभेला लोक […]

The post राज ठाकरेंवर भाजपची टीका ; उत्तर दिलं अजित पवारांनी ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
ajit-pawar
ajit-pawar

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा लोकसभेत मनसेने अप्रत्यक्षरित्या पाऊल ठेवलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आघाडीच्या बाजूने आपला प्रचार करत आहेत. त्यांच्या या प्रचारावर भाजपने जोरदार टीका केली. त्यावरून भाजपला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्याकडे सभा घेण्यासाठी पैसे कुठून येतात या विचाराने भाजपवाले डोकं खाजवतात. राज ठाकरेंच्या सभेला लोक येतात, तुमच्या येतात का? तुमच्या सभा ऐकायला लोकांनी आलं पाहिजे म्हणता, पण दुसर्‍यांच्या सभेला लोक जमले की तुमच्या पोटात दुखतंय. तुम्हाला सोड्याची बाटली द्यावी लागते, असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांची काल इंदापूरात सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे पाच वर्षांपूर्वी आमच्याविरोधात सभा घ्यायचे, मोदींचे समर्थन करायचे, आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला का? ते कुठून पैसे आणतात विचारलं का? असं अजित पवारांनी यावेळी विचारलं. कोल्हापूर इथे शिवसेनेची पहिली सभा झाली. या ठिकाणच्या सभेला जमलेल्या महिलांना मराठी बोलता येत नव्हते, त्या कर्नाटकमधून आणल्या होत्या.  यांच्या सभेला आता लोक जमत नाहीत. हवा बदलायला लागली आहे. त्यामुळे त्यांना वाईट वाटायला लागलं आहे. लोकशाही आहे, आम्ही ती खुल्या मनाने स्वीकारली आणि विरोधकांची भूमिका घेतली. मात्र आता हे लागलेत गाजर दाखवायला, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. तसंच ईव्हीएम मशीनवरही त्यांनी यावेळी वक्तव्य केले.

मायावतीसह सर्वच जण EVM मध्ये बिघाड होतोय असे सांगतात. खरं तर ईव्हीएम हे अमेरिका सुद्धा आता चालवत नाही. ईव्हीएममध्ये जरा गडबडच वाटत असून, आपणही मतदान करताना अगोदर चेक करा, नाहीतर बटण दाबताच ते तिसरीकडेच मतदान व्हायचे, असं मिश्किल पण सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

The post राज ठाकरेंवर भाजपची टीका ; उत्तर दिलं अजित पवारांनी ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107348
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा नियमित ‘असे’ काही https://policenama.com/5-min-workout-will-decrease-belly-fat/ Sat, 20 Apr 2019 05:58:56 +0000 https://policenama.com/?p=107342 Exercise
Exercise

पुणे : पोलासनामा ऑनलाइन – एक्सरसाइज ही वजन कमी करण्यासाठी नसून फिट आणि हेल्दी राहण्यासाठी असते. परंतु, अनेकजण केवळ वजन कमी करण्यासाठी ती करतात. एक्सरसाइज हेल्दी राहण्यासाठी केल्यास आपोआपच वजन नियंत्रणात राहील. पोटावर चरबी जमा झाली असेल तर डायबिटीज व हृदयरोगांचीही समस्या होऊ शकते. ही चरबी कमी करण्यासाठी केवळ ५ मिनिटांचे वर्कआऊट केल्यास बाहेर आलेले […]

The post पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा नियमित ‘असे’ काही appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Exercise
Exercise

पुणे : पोलासनामा ऑनलाइन – एक्सरसाइज ही वजन कमी करण्यासाठी नसून फिट आणि हेल्दी राहण्यासाठी असते. परंतु, अनेकजण केवळ वजन कमी करण्यासाठी ती करतात. एक्सरसाइज हेल्दी राहण्यासाठी केल्यास आपोआपच वजन नियंत्रणात राहील. पोटावर चरबी जमा झाली असेल तर डायबिटीज व हृदयरोगांचीही समस्या होऊ शकते. ही चरबी कमी करण्यासाठी केवळ ५ मिनिटांचे वर्कआऊट केल्यास बाहेर आलेले पोट कमी कमी होऊ शकते.

बायसिकल क्रंच ही चांगली एक्सरसाइज आहे. यामुळे पोटाच्या अ‍ॅब्ससह पोटाच्या दोन्ही बाजूने असलेल्या मांसपेशींनाही व्यायाम मिळतो. अ‍ॅब्डॉमिनिल मांसपेशी म्हणजेच पोटाच्या मांसपेशीचा चांगला वर्कआउट होऊन पोटावरील चरबी कमी होते. पायांना गुडघ्यापासून मोल्ड करुन जमिनीवर पाठिवर झोपा. दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा. पोट आत करा आणि खांदे जमिनीवरुन वर उचला आणि गुडघे छातीच्या जवळ आणा. ही एक्सरसाइज पुन्हा पुन्हा करा.

जलदगतीने पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी ३ वेळी ही एक्सरसाइज केली पाहिजे. १० ते १२ वेळा ही एक्सरसाइज सतत करा. जर मानेची किंवा पाठिची कोणतीही समस्या असेल तर ही एक्सरसाइज करु नये. तसेच एक्सरसाइज करण्यापूर्वी डॉक्टरांनी किंवा फिजिकल थेरपिस्टचा सल्ला जरूर घ्या.

The post पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा नियमित ‘असे’ काही appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107342
बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे पंतप्रधानांकडून समर्थन  https://policenama.com/sadhvi-pragyas-symbol-of-that-culture-support-of-bhopal-candidate-from-narendra-modi-for-lok-sabha-election/ Sat, 20 Apr 2019 05:52:11 +0000 https://policenama.com/?p=107345

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे. आणि ते काँग्रेसला महागात पडणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. […]

The post बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे पंतप्रधानांकडून समर्थन  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे. आणि ते काँग्रेसला महागात पडणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दशतवादाविरुद्ध कडक पाऊल उचलणाऱ्या मोदी सरकारने लोकसभेची उमेदवारी कशी दिली? असा प्रश्न विचारला. त्यावेळी एका महिलेला ते पण एका साध्वीला अशा पद्धतीने छळले आहे. आणि मी गुजरातमध्ये राहून आलेलो आहे. मी काँग्रेसला चांगल्यापैकी ओळखले आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट एका ठिकाणी बसून कागदावर लिहितात त्याच पद्धतीने आमच्या इथे जितके इनकाउंटर झाले. ते सुद्धा अशाच पद्धतीने झाले आहेत. प्रत्येक घटनेला आसच लांबवत होत आणि जुळवत होते.  असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे आणि ते काँग्रेसला महागात पडणार आहे, असेही त्यांनी म्हटले.  याचबरोबर, जस्टीक लोया यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा मृत्यू हा नसर्गिक नसून हत्या आहे असे सांगण्यात आले, असेही त्यांनी म्हटले.

The post बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे पंतप्रधानांकडून समर्थन  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107345
संतापजनक ! कर्जाच्या वसुलीसाठी सावकराकडून नवविवाहितेला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार https://policenama.com/rape-case-registered-in-shahupuri-police-station/ Sat, 20 Apr 2019 05:32:39 +0000 https://policenama.com/?p=107338 RAPE
RAPE

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाइन – कोल्हापूरात कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने नवविवाहित तरुणीला सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोल्हापूरातील शाहूपूरी पोलीस ठाण्यामध्ये सावकारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कुटुंबावर सावकाराने कर्जाऊ दिलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी दबाव आणला. घरातील सुशिक्षित आणि अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या नवविवाहित तरुणीला त्याने सिगारेटचे चटके […]

The post संतापजनक ! कर्जाच्या वसुलीसाठी सावकराकडून नवविवाहितेला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
RAPE
RAPE

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाइन – कोल्हापूरात कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने नवविवाहित तरुणीला सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोल्हापूरातील शाहूपूरी पोलीस ठाण्यामध्ये सावकारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कुटुंबावर सावकाराने कर्जाऊ दिलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी दबाव आणला. घरातील सुशिक्षित आणि अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या नवविवाहित तरुणीला त्याने सिगारेटचे चटके देऊन मारहाणही केली. या तरुणीला ब्लॅकमेल करुन सावकाराने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शाहूपुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले असून या सावकाराचे नाव आत्ताच उघड करण्यास नकार दिला आहे. या सावकाराला आणखी दोघांनी मदत केली असून त्यांचा शोध सुुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस करीत आहेत.

The post संतापजनक ! कर्जाच्या वसुलीसाठी सावकराकडून नवविवाहितेला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107338
बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे : महादेव जानकर https://policenama.com/mahadev-jankar-saying-about-baramati-matdar-sangh-loksabha-20019/ Sat, 20 Apr 2019 05:20:31 +0000 https://policenama.com/?p=107337

The post बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे : महादेव जानकर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या रणधुमाळीला दिवसेंदिवस रंग चढत आहे. तसंच नेत्यांच्या टीकाही वाढत आहेत. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती मतदार संघ येतो. तेथे रासपचे महादेव जानकर हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कट्टर विरोधक आहेत. मागिल निवडणुकीत जानकरांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर जानकरांनी, बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे, असं म्हटलं आहे. युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

बारामतीचा निकाल म्हणजे यावेळी वोटींग स्ट्राईक असेल. ज्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांचा वारसा सांगतात त्यांनी मुलगी, पुतण्या, नातवाच्या पलीकडे काहीही बघितलं नाही. आम्ही सगळ्या मतदारसंघातून मतांचे लीड घेऊन येतो, असं म्हणत जानकरांनी फक्त बारामतीने आम्हाला “इक्वल” द्यावं, अशी विनंतीही केलं.

दरम्यान, २०१४च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंनी महादेव जानकारांचा पराभव केला. तेव्हा जानकरांनी कमळचे चिन्ह न वापरते कपबशीचे चिन्ह वापरले होते. जर जानकरांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं असतं असं भाजपाकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करत आहे. यंदा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतले आहेत.

The post बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे : महादेव जानकर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107337
…म्हणून पार्थ पवारांना दिली उमेदवारी : खा. प्रफुल पटेल https://policenama.com/special-talk-with-praful-patel-in-tondi-pariksha/ Sat, 20 Apr 2019 05:15:50 +0000 https://policenama.com/?p=107335

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा चेहरा नव्हता. राज्यात पवार हा ब्रँड आहे त्यामुळेच मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. अजित पवारांचा मुलगा म्हणून नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हंटले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. […]

The post …म्हणून पार्थ पवारांना दिली उमेदवारी : खा. प्रफुल पटेल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा चेहरा नव्हता. राज्यात पवार हा ब्रँड आहे त्यामुळेच मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. अजित पवारांचा मुलगा म्हणून नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हंटले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भाजपच्या मै भी चौकीदार या मोहिमेवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसात हलक्या भाषेत प्रचार करत आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला असे बोलणे शोभत नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशी अशोभनिय वक्तव्ये करणे चुकीचे आहे. आणि आता मै भी चौकीदार ही काही पक्षाची थीम आहे का ? ही काही पक्षाची थीम असू शकत नाही. उलट मोदींच्या अशा हलक्या प्रचाराचा राष्ट्रवादीला फायदाच होईल. असे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हंटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यंत्रणांनी कोणतेही पुरावे दिले नसताना थेट विरोधी पक्षांवर कसा काय आरोप करतात ? असा सवाल करत, पंतप्रधानांकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. त्यांचे हे दबावतंत्र चुकीचे आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात लोकसभा-राज्यसभेचा दर्जा खाली घसरला आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पार्थ पवार यांच्या उमेदवारी बाबत त्यांना विचारले. त्यावेळी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा चेहरा नव्हता. लोकसभेसाठी पार्थ पवारांचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेतही होते. लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्याचे काही निश्चित नव्हते. केवळ अजित पवारांचा मुलगा म्हणून नाही. तर राज्यात पवार हा ब्रँड आहे आणि त्यामुळेच मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर आणि पक्षाला जर पार्थच्या नावाचा फायदा झालाच तर पक्षासाठी चांगलेच आहे. असेही त्यानी म्हंटले.

The post …म्हणून पार्थ पवारांना दिली उमेदवारी : खा. प्रफुल पटेल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107335
पवार, विखे, खडसे, राणे या दिग्गजांच्या ‘प्रतिष्ठा’ पणाला  https://policenama.com/big-task-for-pawar-vikhe-khadse-and-rane-family/ Sat, 20 Apr 2019 05:09:55 +0000 https://policenama.com/?p=107333

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे, त्यामुळे लोकसभेच्या रिंगातील वातावरण तापत आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खेडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे आहेत. या तिन्ही दिग्गज नेत्यांचे घरातील उमेदवार आहेत. […]

The post पवार, विखे, खडसे, राणे या दिग्गजांच्या ‘प्रतिष्ठा’ पणाला  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे, त्यामुळे लोकसभेच्या रिंगातील वातावरण तापत आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खेडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे आहेत. या तिन्ही दिग्गज नेत्यांचे घरातील उमेदवार आहेत. त्यामुळे यांचे काय निकाल लागतील, ते त्यांचे गड राखण्यात यशस्वी होतील का, याची उत्सुकता लागली आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत अनेक भक्कम उमेदवारांना पराभव पहावा लागला. त्यातही सुप्रिया सुळे ६९,७१९ मतांनी विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर हे होते. आता मात्र दौंड मतदार संघाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल सुप्रिया सुळेंना टक्कर देणार आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांनी पुर्ण पाठिंबा सुप्रिया सुळेंना दिला आहे. दुसरीकडे कांचन कुल यांच्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत.

काँग्रेसमधील चर्चेत असणारे नाव राधाकृष्ण विखे पाटील हे वेगळ्या परिस्थितीत आहेत. मुलाने उमेदवारीसाठी अहमदनगरमधून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. मुलगा भाजपमध्ये आणि वडील काँग्रेसमध्ये आहेत. विखेंनी अद्याप काँग्रेसला राजीनामा दिला नाही की भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नाही. मात्र विखे आपल्या मुलांला पाठिंबा देत आहेत.

जळगावमध्ये भाजपमध्ये गिरीश महाजन यांचे नाव वर आल्याने तेथील मंत्री एकनाथ खडसेंच्या नावाचा दबदबा कमी झाला. मात्र यंदा एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे या रावेरमध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय होईल का यावर सर्वांची नजर आहे.

लोकसभेच्या रिंगणातील चौथे नाव रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश हे आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे ते हि निवडणूक लढवत आहेत.  येथे त्यांच्यासमोर शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, राजकारणातील या दिग्गजांचे पुत्र-पुत्री, स्नुषा यांचा राजकारणातील पेपर आहे. हा पेपर हे मजबूतीने सोडवण्यात त्यांना यश येते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

The post पवार, विखे, खडसे, राणे या दिग्गजांच्या ‘प्रतिष्ठा’ पणाला  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107333
ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प  https://policenama.com/thane-vashi-trans-harbour-local-service-disrupted-overhead-wire/ Sat, 20 Apr 2019 04:46:39 +0000 https://policenama.com/?p=107324

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून ट्रान्सहार्बर लाईन्स ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याकडून वाशीला जाणाऱ्या लोकल जागेवरच उभ्या राहिल्या आहेत. तसेच वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलही ठप्प झाल्या आहे. यामुळे वाशी ते ठाणे दरम्यानच्या सर्व रेल्वेस्थानकावर लोकांची मोठी गर्दी झाली असून पुन्हा […]

The post ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून ट्रान्सहार्बर लाईन्स ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याकडून वाशीला जाणाऱ्या लोकल जागेवरच उभ्या राहिल्या आहेत. तसेच वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलही ठप्प झाल्या आहे.

यामुळे वाशी ते ठाणे दरम्यानच्या सर्व रेल्वेस्थानकावर लोकांची मोठी गर्दी झाली असून पुन्हा लोकल सेवा कधी सुरु होईल, याची प्रवासी वाट पहात आहेत. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच लोकल सेवा पुन्हा पूर्ववत होईल, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

The post ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107324
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ‘एवढी’ रक्कम खात्यात ठेवणे नुकसानकारक https://policenama.com/sbi-bank-news-1-lac-in-saving-account-its-yours-lose/ Sat, 20 Apr 2019 04:43:58 +0000 https://policenama.com/?p=107325

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडियामधील ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम आहे का?, तर सावध व्हा, कारण तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण १ मे २०१९ पासून व्याजाचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यातील रकमेवर येणारे व्याज कमी होणार आहे. स्टेट बँकेने १ मेपासून व्याज दर […]

The post स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ‘एवढी’ रक्कम खात्यात ठेवणे नुकसानकारक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडियामधील ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या बचत खात्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम आहे का?, तर सावध व्हा, कारण तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण १ मे २०१९ पासून व्याजाचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यातील रकमेवर येणारे व्याज कमी होणार आहे.

स्टेट बँकेने १ मेपासून व्याज दर निश्चित करण्यासाठी ‘एक्सटर्नल बेंच मार्किंग’ पद्धत स्वीकारायचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत बँकेचा मुख्य व्याज दर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटशी जोडला जातो, त्यामुळे रेपो रेट कमी/जास्त झाल्यास त्याचा परिणाम थेट व्याज दरावर होणार आहे. रेपो रेट जसा कमी-जास्त होईल तसे व्याज दरही कमी-जास्त होते. रिझर्व्ह बँकेने ४ एप्रिलच्या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात केली आहे. त्यामुळे व्याजदर कमी होणार आहे.

स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याज दरात १ मेपासून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक रकमेवरील व्याज दर रेपो रेटपेक्षा २.७५ टक्क्यांनी कमी राहील. सध्या रेपो रेट ६ टक्के आहे म्हणजे बचत खात्याचा दर ३.२५ टक्के राहील, तर एक लाखापेक्षा कमी रकमेवर ३.५० टक्के व्याज मिळेल.

दरम्यान, एक्सटर्नल, बेंच मार्किंग पद्धत स्वीकारणारी स्टेट बँक ही पहिली बँक आहे. भविष्यात इतर बँकाही ही पद्धत स्वीकारू शकतात. याअंतर्गत स्टेट बँकेने कर्जावरील व्याजामध्ये १० एप्रिलला ०.०५ टक्के कपात केली आहे, तसेच ३० लाखापर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्के कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्टेट बँकेच्या ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ८.५० टक्के ते ८.९० टक्के व्याज द्यावे लागेल.

The post स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ‘एवढी’ रक्कम खात्यात ठेवणे नुकसानकारक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
107325